जनहित प्रतिष्ठान विद्यालयात जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
२४३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग

जनहित प्रतिष्ठान विद्यालयात जागतिक हस्ताक्षर दिनानिमित्त हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन
२४३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग
बारामती वार्तापत्र
बारामती येथील जनहित प्रतिष्ठानचे प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात आज गुरुवार दि. २३ जानेवारी २०२५ रोजी ‘जागतिक हस्ताक्षर’ दिनानिमित्त प्रथमच नविन अशा हस्ताक्षर स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यालयातील २४३ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. वरील सर्व विद्यार्थी स्पर्धकांनी सुंदर व सुरेख हस्ताक्षर काढत उत्साहाने अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात स्पर्धेत भाग नोंदवला. या स्पर्धेतून इयत्तानुसार प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात येणार असून यशस्वी विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात येणार आहे.
सदर स्पर्धा आयोजित केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा.श्री. किशोर कानिटकर, उपाध्यक्ष (गुरुकुल) मा.श्री. हृषीकेश घारे (सर), उपाध्यक्ष (प्राथमिक) मा.श्री. किरण शहा (वाडीकर), सचिव मा. श्री. सतिश गायकवाड (सर), खजिनदार मा.श्री. सतिश धोकटे, सर्व संचालक, गुरुकुलचे आचार्य श्री. हनुमंत दुधाळ, प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री. अतुल कुटे व बालभवन प्रमुख श्री. निलेश भोंडवे यांनी अभिनंदन व कौतुक केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी यांनी परिश्रम व सहकार्य केले.