खडकवासला प्रकल्पातील ‘ओव्हरफ्लो’ पाणी इंदापूर तालुक्यातील तलावात सोडण्याची रासपची मागणी
खडकवासला कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दिले मागणीचे निवेदन

खडकवासला प्रकल्पातील ‘ओव्हरफ्लो’ पाणी इंदापूर तालुक्यातील तलावात सोडण्याची रासपची मागणी
खडकवासला कालवा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांकडे दिले मागणीचे निवेदन
इंदापूर : प्रतिनिधी
खडकवासला प्रकल्पातील ‘ओव्हरफ्लो’ पाणी इंदापूर तालुक्यातील तलावात सोडण्याची मागणी राष्ट्रीय समाज पक्षाकडून करण्यात आली असून यासंदर्भातील मागणीचे निवेदन खडकवासला कालवा विभाग इंदापूरचे कार्यकारी अभियंत्यांकडे मंगळवारी ( दि.१४ ) देण्यात आले आहे.
सध्या खडकवासला धरण साखळीतील सर्व धरणे व खडकवासला प्रकल्प शंभर टक्के भरलेला आहे.परंतू इंदापूर तालुक्यात तुलनेने कमी पाऊस झाल्यामुळे मदनवाडी, भादलवाडी, पळसदेव, तरंगवाडी तलाव कोरडेठाक पडले असल्याकारणाने सदरील तलाव तात्काळ भरून घेण्यात यावे अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रासपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिंगाडे, तालुकाध्यक्ष सतीश तरंगे, उपाध्यक्ष गणेश हेगडकर, शहराध्यक्ष श्रीनिवास सातपुते, सोन्या जानकर, पप्पू चोरमले, सोमनाथ कोळेकर, विश्वास कोळेकर उपस्थित होते.