जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाकडून भावाचा केबल टॅगने गळा आवळून खून.
कलम 302 ,201 ,34 गुन्हा दाखल

जमिनीच्या वादातून सख्ख्या भावाकडून भावाचा केबल टॅगने गळा आवळून खून.
कलम 302 ,201 ,34 गुन्हा दाखल
निलेश भोंग; प्रतिनिधी
इंदापूर तालुक्यातील मौजे अगोती नंबर 1 गावचे हद्दीत संजय आवताडे यांचे केळीचे शेतात मृतदेह आढळून आला.जमिनीचे वादातून केबलचे टॅग ने एकाचा गळा आवळून खून करण्यात आला आहे. असून प्रभाकर विठ्ठल पवार वय 52 वर्ष सध्या रा.मोहन नगर पिंपरी चिंचवड पुणे मूळ रा. अगोती नंबर 1 तालुका इंदापूर असे खून झालेल्या व्यक्तीचे नांव आहे.
राजकुमार वसंतराव जाधव वय 50 वर्ष व्यवसाय शेती राहणार सराफवाडी तालुका इंदापूर यांच्या फिर्यादीवरुन आरोपी ज्ञानदेव विठ्ठल पवार वय 55 वर्ष,सुधीर ज्ञानदेव पवार वय 31 वर्ष व शरद ज्ञानदेव पवार वय 34 वर्ष सर्व राहणार अगोती नंबर 1 तालुका इंदापूर यांविरूध्द इंदापूर पोलिसांत भादवि कलम 302 ,201 ,34 गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शनिवार दि.10 जुलै रोजी रात्री 08 वाजता ते रविवार दि.11 जुलै रोजीचे सकाळी साडेनऊ वाजता चे दरम्यान ही घटना घडली असून या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.या घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी बारामती नारायण शिरगांवकर व पोलीस निरीक्षक धन्यकुमार गोडसे यांनी घटनास्थळी भेट दिली आहे.पुढील तपास सहाय्यक पो.निरीक्षक माने करीत आहेत.