जय जवान माजी सैनिक संघटना व नगरपरिषद च्या वतीन पुस्तकबँक
एक अभिनव उपक्रम….
बारामती वार्तापत्र
गरजू,आर्थिकदृष्ट्या कमकवुत,गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक पुस्तके सहज व कमी वेळेत गरजेनुसार उपलब्ध होणे साठी तालुक्यातील जय जवान माजी सैनिक संघटना व बारामती नगरपरिषद यांच्या सयूंक्त विद्यमानाणे ‘पुस्तक बँक’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे .
प्रत्येक घरात कमीत कमी एक विद्यार्थी असतोच. दरवर्षी आपण आपल्या मुलांसाठी नवीन पुस्तके खरेदी करत असतो.. परंतु त्या वापरलेल्या पुस्तकांच काय? एकतर ते रद्दीला जातात किंवा घरात अडगळ होऊन राहतात… त्यापेक्षा ती जुनी पुस्तके गरजू विदयार्थ्याना उपयोगी ठरू शकतात… पुस्तक बँक या अभिनव उपक्रमाचे आयोजन दिनांक 9 व 10 एप्रिल रोजी करणेत येत आहे…
ज्यामध्ये आपणाकडील सुस्थितीत असणारी जुनी शालेय पुस्तके आपण जमा करू शकता व आपणास आवश्यक असणारी पुस्तके घेऊन जाऊ शकता (उपलब्धतेनुसार)…. याचा लाभ सर्व गरजू ना होईल च त्याचबरोबर पुस्तकांचा पुनर्वापर करून पर्यावरणास मदत सुद्धा होईल.
या उपक्रमध्ये सर्व सहभागी व्हा जे नको ते द्या, जे हवे ते घेऊन जा असे आव्हान जय जवान माजी सैनिक संघटना अध्यक्ष हनुमंत निबाळकर व नगरपरिषद चे मुख्यधिकारी महेश रोकडे यांनी केले आहे.
तरी इच्छुकानी शारदा प्रांगण जय जवान माजी सैनिक संघटना कार्यालय सूर्यनगरी शाहू हायस्कुल सातव शाळा या ठिकाणी ०९ व १० एप्रिल रोजी सकाळी वाजता उपस्तीत राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्याच बरोबर अधिक माहितीसाठी समन्वयक :-
1) संतोष तोडकर 8850732061
2) रणधीर लोहाट 8010704249
3) हनुमंत निंबाळकर 7447800391
4) शिवनींगा माळी 9881687815