जागतिक कोरोनात बारामतीच्या पोलीसांचे कार्य कौतुकास्पद.
पोलीस निरीक्षक वादाच्या भोवर्यात सापडल्याने नागरीकांत तर्कवितर्क चर्चेला उधान.
जागतिक कोरोनात बारामतीच्या पोलीसांचे कार्य कौतुकास्पद.
पोलीस निरीक्षक वादाच्या भोवर्यात सापडल्याने नागरीकांत तर्कवितर्क चर्चेला उधान.
बारामती: जागतिक कोरोना विषाणूच्या पार्श्र्वभूमीवर बारामतीच नव्हे तर संपूर्ण भारत देशात डॉक्टर, पोलीस, आरोग्य विभाग व पत्रकारांनी जे काम केले ते उल्लेखनीय व कौतुकास्पद आहे. बारामतीत गेल्या दोन महिन्यात एकही कोरोनाचा रूग्ण आढळून आला नाही त्यामुळे याचे सर्व श्रेय बारामतीतील सर्व प्रशासनाला विशेषत: पोलीसांना जात आहे.
मात्र, गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून बारामती शहरचे पोलीस निरीक्षकांना एका वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. त्यामुळे बारामतीतील पोलीसांची प्रतिमा मलीन होत आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून पोलीसांनी घेतलेली दक्षता म्हणजे बारामतीकरांसाठी कौतुकाची बाब आहे. तर्कवितर्क चर्चेमुळे बारामतीकर संभ्रम अवस्थेत आहेत. उपमुख्यमंत्री ना.अजित पवार यांच्या पुढील दौर्यात या प्रकरणात कोणता निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.
लॉकडाऊन काळात जळोची येथील पोलीस कर्मचार्याच्या अपघात प्रसंगी रात्रीच्या 12 वाजेपर्यंत थांबून उपचारासाठी खिशातून 15 हजार रूपये देणारे औदुंबर पाटील आहेत.
पोलीस कर्मचारी कामाच्या व्यापाने त्रस्त झाले होते त्यांना दररोज व्यायाम, योगा व सायकलींग व फावल्या वेळात व्हॉलीबॉल खेळण्यास लावून आलेला कंटाळू दूर करण्यामध्ये व कर्मचार्यांचे मनोबल वाढविण्यामध्ये पाटील यांचे खूप मोठे योगदान आहे. संकटकाळी एकमेकांना साथ देण्याचे काम सुद्धा पोलीसांनी केले आहे.
बारामतीत कोरोनाचा दुसरा रूग्ण समर्थनगर येथे आढळल्यानंतर रात्रीचा दिवस करणारे पीएसआय पद्मराज गंपले, एपीआय सचिन शिंदे व पीएसआय शेलार होते. विविध प्रश्र्न उपस्थित झाल्यावर पहिला संपर्क पोलीस कर्मचारी पोपट नाळे यांना केला जातो कारण हक्काचा माणूस म्हणून बारामतीकर त्यांचेकडे पाहत असतात. त्यांचा सुद्धा कायदा व सुव्यवस्था राखण्यामध्ये मोलाचा वाटा आहे.