जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती नगरपरिषदेव्दारा स्थापित मोफत विधी सल्ला केंद्र पूर्ववतपणे चालू
मोफत विधी सल्ला केंद्र स्थापन करण्यात आ

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बारामती नगरपरिषदेव्दारा स्थापित मोफत विधी सल्ला केंद्र पूर्ववतपणे चालू
मोफत विधी सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले
बारामती वार्तापत्र
बारामती नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण विभागामार्फत सन 2018 मध्ये शहरातील महिलांकरिता त्यांच्यासंबंधीत विविध कायदे , नियमावली जसे की भारतीय दंड विधान , फौजदारी प्रक्रीया संहिता, दिवाणी प्रक्रिया संहिता, हिंदू विवाह कायदा , हिंदू वारसा कायदा, हुंडा प्रतिबंधक कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक छळ – 2013 कायदा, विशाखा समितीच्या मार्गदर्शक सूचना, गर्भपात कायदा, प्रसुतीविषयक कायदेशीर तरतूदी व सोईसुविधा, वारसाहक्क , सासरच्या व माहेरच्या संपत्तीमधील महिलांचा हक्क , पोटगीचा हक्क, POCSO कायदा, भारतीय संविधानात महिलांकरीता केलेल्या विशेष तरतूदी आदी बाबीविषयी महिलांमध्ये जनजागृती करणेकरीता तसेच त्यांना मोफत कायदेशीर सहाय्य व सल्ला देणे याकरीता बारामती नगरपरिषद इमारतीमध्ये मोफत विधी सल्ला केंद्र स्थापन करण्यात आले होते. या केंद्रामार्फत आठवड्यातून एक दिवस मोफत मार्गदर्शन केले जात होते. मात्र विविध कारणांमुळे व कोरोना मुळे सदर केंद्राचे काम विस्कळीत झाले होते.
08 मार्च 2021 रोजी महिलादिनाचे औचित्य साधून सकाळी 11 वाजता महिला व बालकल्याण सभापती सौ. आशा दत्तू माने यांचे हस्ते कोरोनाविषयक नियम पाळून छोटेखाणी कार्यक्रम घेवून मोफत विधी सल्ला केंद्र पूर्ववतपणे चालू करण्यात आले. या केंद्रामार्फत दर गुरूवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत मार्गदर्शन केले जाईल.
या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून विधी सल्ला समितीच्य सदस्या ॲड. प्रिया गुजर- महाडिक, ॲड. किर्ती गाढवे, ॲड. सिमा लोंढे, महिला व बालकल्याण उपसभापती ज्योती सरोदे, शिक्षण मंडळ सभापती बेबीमरियम बागवान, तसेच नगरसेविका सीमा चिंचकर, मयुरी शिंदे, अनिता जगताप, दिंडे, वैशाली अक्कीवाटी आदी उपस्थित होते.
महिला व बालकल्याण उपसभापती सरोदे यांनी पाहुण्यांचे आभार मानले. तसेच महिला व बालकल्याण सभापती माने यांनी शहरातील महिलांना निर्धास्तपणे कायदेशीर मदतीसाठी महिला व बालकल्याण विभागास संपर्क साधण्याचे आवाहन केले.