जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार काल इंदापुरात रेमेडिसविर झाले मंजूर, पण कोणकोणत्या हाॅस्पिटल्स ला किती?
औषध प्रशासन विभागास ही इंजेक्शन्स औषधे योग्य प्रकारे विनियोग होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत.

बारामती वार्तापत्र
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांच्या आदेशानुसार बारामती व इंदापूर तालुक्यात काल तारीख 22 दवाखाना निहाय रेमेडीसीवीर मंजूर करण्यात आली व पाठवण्यात आली.
जिल्हाधिकारी डॉक्टर राजेश देशमुख यांनी केलेल्या मंजुरी नुसार इंदापूर तालुक्यातील पार्वती नर्सिंग होम येथील 15 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 9, निळकंठ हॉस्पिटल इंदापूर मधील 16 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 10, श्रेयस नर्सिंग होम मधील 7 रुग्ण संख्या क्षमतेसाठी 4, ओजस हॉस्पिटल च्या 9 क्षमतेसाठी 5, निळकंठेश्वर आयसीयू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल जंक्शन मधील 36 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 22, भिगवण मेडिकेअर हॉस्पिटल मधील 16 क्षमतेसाठी 10, यशोधरा अँड ट्रॉमा सेंटर हॉस्पिटल भिगवण मधील 22 रुग्णसंख्या क्षमतेसाठी 13 इंजेक्शन्स मंजूर झाली आहेत.
दरम्यान या संदर्भात औषध प्रशासन विभागास ही इंजेक्शन्स औषधे योग्य प्रकारे विनियोग होत असल्याची खातरजमा करण्याचे आदेश देखील दिले आहेत. भरारी पथकांनी या औषधांच्या वाटप व वितरणाबाबत खात्री करून अनियमितता आढळल्यास संबंधित रुग्णालय प्रशासन किंवा घाऊक विक्रेत्यांवर नियमानुसार कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत.