जिल्हास्तरीय कला क्रीडा स्पर्धेत बारामती तालुक्यातील सांगवीच्या शार्दुलची रेकॉर्डब्रेक कामगिरी !!
एकूण ४६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा

जिल्हास्तरीय कला क्रीडा स्पर्धेत बारामती तालुक्यातील सांगवीच्या शार्दुलची रेकॉर्डब्रेक कामगिरी !!
एकूण ४६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा
सांगवी; प्रतिनिधि
पुणे जिल्हा परिषद आयोजित यशवंतराव चव्हाण कला क्रीडा स्पर्धा नुकत्याच हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुल, राजगुरुनगर, खेड या ठिकाणी संपन्न झाल्या.
या स्पर्धेमध्ये बारामती तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा सांगवीच्या चि. शार्दुल चंद्रसेन क्षिरसागर याने उंचउडी (मुले – मोठा गट )या क्रीडा प्रकारात जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून अतुलनीय यश संपादन करतानाच लांबउडी (मोठा गट- मुले) व 100 मीटर धावणे (मोठा गट- मुले )या दोन्ही स्पर्धेतही द्वितीय क्रमांक प्राप्त करत बक्षिसांची हॅट्रिक केली. एकाच वर्षी एका विद्यार्थ्याने जिल्हास्तरावर तीन क्रमांक प्राप्त करण्याची रेकॉर्डब्रेक कामगिरी यामुळे शार्दुलच्या नावावर रेकॉर्ड झाली आहे.
यावर्षीच्या कला क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेमध्ये एकूण ४६ प्रकारच्या क्रीडा स्पर्धा झाल्या. त्यामध्ये सांगवी शाळेने तालुकास्तरावर ११ स्पर्धांमध्ये (कबड्डी मोठा गट मुले, लेझीम मोठा गट मुले, लोकनृत्य मोठा गट, उंचउडी मोठा गट मुली, प्रश्नमंजुषा मोठा गट, 100 मीटर धाने मोठा गट मुले, लांबउडी मोठा गट मुले, उंचउडी मोठा गट मुले, बडबडगीत छोटा गट, वक्तृत्व स्पर्धा मोठा गट व बुद्धिबळ मोठा गट )प्रथम क्रमांक मिळविण्याचाही रेकॉर्ड केला आहे.
याबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी मा श्री निलेश गवळी साहेब, शिवनगर बीटचे विस्ताराधिकारी मा श्री संजय जाधव साहेब, शिरवली केंद्राच्या केंद्रप्रमुख मा सौ शफिया तांबोळी मॅडम तसेच बारामती दूध संघाचे मा चेअरमन मा श्री प्रकाशनाना तावरे, संजय गांधी निराधार योजनेचे मा.अध्यक्ष मा श्री किरणदादा तावरे, माळेगाव कारखान्याचे संचालक मा श्री अनिल तावरे, माळेगावचे माजी संचालक मा श्री विजयराव तावरे शिवनगर विद्या प्रसारक मंडळाचे विश्वस्त मा श्री महेशअण्णा तावरे, भाजप जिल्हा युवा मोर्चाचे अध्यक्ष मा श्री युवराज तावरे पाटील, बारामती मार्केट कमिटीचे संचालक दत्तात्रय तावरे पाटील, सांगवीचे सरपंच मा श्री चंद्रकांत तावरे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा श्री नितीन तावरे , उपाध्यक्षा मा सौ जयंतीताई तावरे मुख्याध्यापक मा श्री संजय गायकवाड आदी मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले.
यशस्वी खेळाडूंना श्री संतोष पाथरकर, श्री दिगंबर बालगुडे ,श्री मारुती जगताप, श्री राजेंद्र सोनवणे, श्री यासीन शेख,सौ.संगीता झगडे, सौ सुनिता खलाटे,सौ.भाग्यश्री कलढोणे, सौ रेखा लकडे, सौ दिपाली साळुंके,सौ. सीमा साळुंखे, सौ हर्षदा जगताप, सौ सोनाली तांदळे,सौ शांता बालगुडे, सौ सुरेखा माटे व सौ.अश्विनी कुंभार या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.