जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वैभवात भर घालणार : प्रांताधिकारी दादासो कांबळे
विविध संस्था व क्रीडा प्रशिक्षक यांच्या वतीने सुद्धा लकडे यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वैभवात भर घालणार : प्रांताधिकारी दादासो कांबळे
विविध संस्था व क्रीडा प्रशिक्षक यांच्या वतीने सुद्धा लकडे यांचा सन्मान करण्यात आला.
बारामती वार्तापत्र
एका छताखाली सर्व खेळाच्या अत्याधुनिक सुविधा मिळत असताना खेळाडू घडविणारे जिल्हा क्रीडा संकुल क्रीडा वैभवात भर घालणारे ठरेल असे प्रतिपादन बारामती चे प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
शनिवार ९ एप्रिल रोजी क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांची लातूर जिल्हा क्रीडाधिकारी नियुक्ती बदल व बारामती च्या क्रीडा संकुल मधील भरीव योगदानाबद्दल क्रीडा संकुल समिती, बॅडमिंटन असोसिएशन ,प्रशिक्षक,खेळाडू यांच्या वतीने आयोजित सत्कार समारंभ मध्ये प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते या प्रसंगी,उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कार्यालय अधीक्षक हनुमंत पाटील, तहसीलदार विजय पाटील,जिल्हा क्रीडाधिकारी महादेव कसगावडे,उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे,मुख्यधिकारी महेश रोकडे,बांधकाम विभागाचे उपअभियंता अमोल पवार,पाटबंधारे विभागाचे प्रवीण घोरपडे, व तालुका राष्ट्रवादीचे अध्यक्ष संभाजी होळकर, बारामती बँक चे चेअरमन सचिन सातव, भाजपा तालुकाध्यक्ष पांडुरंग कचरे व बॅडमिंटन असोसिएशनचे अविनाश लगड, सुनील पोटे,राजेंद्र गोफने, दीपक काटे,समाधान पाटील,विशाल हिंगणे,रियाझ शेख,धनंजय गावडे,संग्राम तावरे,दत्तात्रय बोराडे,महेंद्र सूर्यवंशी आदी मान्यवर उपस्तीत होते.
खेळाडू साठी शासनाच्या सेवा सुविधा पुरवीत असताना क्रीडा संकुल मध्ये सर्व खेळ व्याहवेत,उत्कृष्ट खेळाडू घडवावेत व त्यांचा नित्यनियमाने सराव होणे साठी व संकुल चा विस्तार होणे साठी जगन्नाथ लकडे यांनी केलेला पाठपुरावा कौतुकास्पद असल्याचे सर्वच मान्यवरांनी सांगितले.
“ग्रामीण भागातील खडतर परिस्थिती असताना जिद्द,चिकाटी व आत्मविश्वास च्या बळावर धावणे क्रीडा प्रकारात भारतासाठी पदके जिकू शकलो व याच खेळाणे रोजीरोटी व प्रतिष्ठा दिली त्यानंतर याच अनुभवाच्या शिदोरीवर शासनाच्या सेवेच्या माध्यमातून खेळाडू साठी आणखीन भरीव कामगिरी करू असे सत्काराला उत्तर देताना जगन्नाथ लकडे यांनी सांगितले प्रास्ताविक अविनाश लगड यांनी केले,
मानपत्र वाचन डॉ चंद्रकांत पिल्ले व महेश चावले यांनी केले सूत्रसंचालन अनिल सावळेपाटील यांनी केले तर आभार श्रीनिवास बनकर यांनी केले.
विविध संस्था व क्रीडा प्रशिक्षक यांच्या वतीने सुद्धा लकडे यांचा सन्मान करण्यात आला.