जिल्हा क्रीडा संकुल मध्ये वृक्षारोपण संपन्न.
बारामती:वार्तापत्र
डॉक्टर डे, आषाढी एकादशी (बुधवार 1 जुलै) निमित्त जिल्हा क्रीडा संकुल आवारात वृक्षारोपण करण्यात आले.
वृक्षारोपण कार्यक्रमास बारामती चे प्रांतधिकारी दादासाहेब कांबळे, तहसीलदार विजय पाटील, क्रीड़ा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्रो कबड्डी खेळाडू दादा आव्हाड क्रेडाई चे अध्यक्ष दीपक काटे,बारामती तालुका बैडमिंटन असो चे पदाधिकारी व नियमित बॅडमिंटन खेळण्यास येणारे खेळाडू डॉक्टर,यांचे हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
येथील बहु उद्देशीय हॉल मधे नवीन वायरिंग तसेच दिवे बसविनेचे काम पुर्णत्वाकडे आले आहे व पुढील टप्प्यात संरक्षक भीतीच्या बाहेरील बाजू मध्ये वृषारोपन करण्यात येणार आहे , उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधीच्या माध्यमातून उर्वरित सर्व कामे पूर्ण होणार असल्याचे तालुका क्रीडा अधिकारी जन्नाथ लकडे यांनी प्रास्ताविक मध्ये सांगितले.
आशा प्रकारे कार्यक्रम ही काळाची व पर्यावरणाची गरज असल्याचे दादासाहेब कांबळे यांनी सांगितले.
उपस्थितांचे आभार दीपक काटे यांनी मानले.