जिल्ह्यातील 1483 पैकी 1381 अहवाल निगेटिव्ह, अजुन 41 व्यक्तींच्या स्त्राव चाचणी अहवालाची प्रतीक्षा
अहमदनगर, दि. २५- जिल्हा रुग्णालयाने पुण्याच्या लष्करी वैद्यकीय महाविद्यालयाकडे काल पाठविलेल्या ४१ व्यक्तींच्या घशातील स्त्राव चाचणीचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर यांनी दिली. जिल्हा रुग्णालयाच्या वतीने आतापर्यंत १४८३ व्यक्तींचे स्त्राव नमुने चाचणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यातील १३८१ व्यक्तींचे स्त्राव चाचणी अहवाल निगेटीव आले आहेत. तर एकूण कोरोना बाधीत रुग्णांची संख्या ४० झाली आहे. यापैकी दोघा रुग्णांचा मृत्यू झाला असून २४ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
सध्या ६९० व्यक्तींना त्यांच्या घरीच देखरेखीखाली ठेवण्यात आले असून १२२ जणांना हॉस्पिटल मध्ये देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. यात जिल्हा रुग्णालयात १०२, एआयएमएस मध्ये ०६ व्यक्ती उपचार घेत आहेत. बूथ हॉस्पिटल मध्ये १४ कोरोना बाधीत रुग्णांवर उपचार सुरू आहेत.