जिल्ह्यात कोविड केअर सेंटरसाठी ४ हुन हजार अधिक बेड उपलब्ध तर विशेष कोविड हेल्थ सेंटरसाठी एक हजार बेड्स
अहमदनगर, दि.15 – अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा (कोविड १९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासन आता त्रिस्तरीय यंत्रणा कार्यान्वित करणार आहे. जिल्ह्याच्या महानगरपालिका क्षेत्रात तसेच १४ तालुक्यात ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचे नियोजन पूर्ण झाले असून आता प्रत्येक ठिकाणी या कोविड केअर सेंटरमधूनच (सीसीसी ) रुग्णांची तपासणी करुन त्यांच्यात आढळलेल्या लक्षणांनुसार पुढील उपचार केले जाणार आहे. आजाराची लक्षणे दिसतील त्यांना विशेष कोविड हेल्थ सेंटर येथे तपासणीसाठी पाठविण्यात येईल. सीसीसी साठी जिल्ह्यात ४ हजार १०० बेडसची उपलब्धता तर डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरसाठी ०१ हजार २९ बेडसच्या उपलब्धतेचे नियोजन करण्यात आले आहे. याशिवाय, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर येथे डेडिकेटेड कोविड-१९ हॉस्पिटलसाठी ५४० बेडसची उपलब्धता असणार आहे.
जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रदीपकुमार मुरंबीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी तालुकास्तरीय आरोग्य यंत्रणा आणि महानगरपालिका आरोग्य विभागाशी समन्वय करुन यासंदर्भातील आराखडा तयार करुन त्याची कार्यवाही पूर्ण करुन अंमलबजावणीसाठी ही यंत्रणा सज्ज झाली आहे.
राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने यासंदर्भात सीसीसी, डीसीएचसी आणि डीसीएच सुरु करण्यासंदर्भात मार्गदर्शक सूचना सर्व जिल्हास्तरीय आरोग्य यंत्रणेला पाठविल्या होत्या. त्यानुसार अहमदनगर जिल्ह्यात तशी व्यवस्था करण्यात आली आहे.
सीसीसी साठी विविध बांधून पूर्ण झालेल्या इमारती, वसतीगृहे यांच्या जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. त्या त्या भागातील सर्व तापाचे रुग्ण या केंद्रांवर संदर्भित केले जाणार आहेत. या सेंटरमध्ये तापाच्या रुग्णांवर उपचार केले जातील. ताप कोविड सदृश्य आजारामुळे असल्याचे निदान झाल्यास अशा रुग्णास संशयित रुग्ण कक्षात दाखल केले जाईल. अशा रुग्णांच्या घशातील स्त्राव नमुना तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येईल. तपासणीअंती कोविड संसर्ग असल्याचे निदर्शनास आल्यास तसेच रुग्णास आजाराची लक्षणे नसल्यास याच सीसीसी मधील विलगीकरण कक्षामध्ये त्याला दाखल केले जाईल. चाचणी अहवाल नकारात्मक आल्यास पुढील औषधोपचार देऊन घरी पाठवण्यात येईल. मात्र, रुग्णास मध्यम तीव्रतेचा आजार असल्यास त्याला विशेष अर्थात डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये संदर्भीत करण्यात येईल. याठिकाणी ऑक्सिजनची व्यवस्था असणार आहे. तीव्र असल्यास त्याला थेट डेडिकेटेड कोविड ह़ॉस्पिटलमध्ये संदर्भीत करण्यात येईल. रुग्णास कोणत्याही परिस्थितीमध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा ग्रामीण रुग्णालयामध्ये संदर्भीय करु नये, अशा मार्गदर्शक सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने दिल्या आहेत.
याशिवाय, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) मध्ये विशेषज्ञाच्या सेवा. ऑक्सीजन आणि व्हेंटिलेटर सुविधा आवश्यक असणाऱ्या रुग्णांना दाखल करण्यात येईल. याठिकाणी रुग्ण दाखल असताना त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यास आणि लक्षणे नाहिशी झाल्यास रुग्णाच्या प्रकृतीमानानुसार त्याला सीसीसी किंवा डीसीएचसी मध्ये संदर्भीत करण्यात येईल. या केंद्रामध्ये देखील ताप उपचार केंद्र (फीवर ट्रीटमेंट सेंटर) सुरु करण्यात येणार आहे.
सीसीसी साठी तालुकानिहाय विविध इमारतीमध्ये केलेली व्यवस्था आणि कंसात बेडसची संख्या नमूद करण्यात आली आहे.
अकोले तालुक्यात शासकीय आदिवासी वसतीगृह, खानापुर (बेडची संख्याच 60), मंगला नर्सिंग होम (50) असे एकुण (110) बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. जामखेड – रत्नमदीप मेडिकल फाऊंडेशन (240), कर्जत – दादा पाटील विद्यालय गर्ल्सं हॉस्टेफल (50), गायकरवाडी आश्रम शाळा, गायकरवाडी (150), महात्माी गांधी विद्यालय, बॉईज हॉस्टेआल, कर्जत (50), कोपरगाव- एस. एस. जी. एम. कॉलेज हॉस्टेशल (100), नगर – रायसोनी कॉलेज, चास (325), नेवासा- त्रिमुर्ती एज्यु केशन कॉम्लेसयक क्सह, नेवासा फाटा (240), पारनेर- राजीव गांधी इंजिनिअरींग कॉलेज, कर्जुळे ह-या (50), अपंग निवासी विद्यालय, टाकळी ढोकेश्व र (25), संत यादवबाबा शिक्षण एज्युरकेशन प्रसारक मंडळ, राळेगणसिध्दी (50), गर्व्हशनमेंट लेडिज हॉस्टेगल (25), न्युए आर्टस बॉईज हॉस्टेंल (50), न्यु( आर्टस गर्ल्सक हॉस्टेेल (40), पाथर्डी – श्री टिळक जैन विद्यालय (100), श्री वसंतदादा पाटील हॉस्टे्ल (100), राहाता – द्वारावती शिर्डी (240), राहुरी – महात्मास फुले कृषी विद्यापीठ राहुरी पीएचडी होस्टेल (240), संगमनेर – सिध्दरकला हॉस्पी0टल संगमनेर खु. (150), शेळके हॉस्पी्टल (100) असे एकूण 250. शेवगाव – त्रिमूर्ती पब्लिक स्कूपल वसतीगृह शेवगाव (250), श्रीगोंदा – समाजकल्या ण विभागाचे मुलींचे वसतीगृह, श्रीगोंदा (100), छत्रपती शिवाजी कॉलेज मुलींचे वसतीगृह (240), समाजकल्याचण विभागाचे मुलांचे वसतीगृह (75) असे एकूण 415. श्रीरामपूर तालुक्याीत – मेडिकल कॉलेज वडाळा महादेव (700), बाबासाहेब आंबेडकर समाजकल्याीण वसतीगृह, हरेगाव रोड श्रीरामपूर (300) असे एकूण 1000. अहमदनगर महानगरपालिका क्षेत्र – दीपक हॉस्पीलटल (50), बुथ हॉस्पीदटल (50) असे एकूण 100.
डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर अर्थात डीसीएचसी साठी विविध हॉस्पिटल्समध्ये उपलब्ध असणाऱ्या बेडसची संख्या तालुकानिहाय पुढीलप्रमाणे –
अकोले- डॉ. बुळे हॉस्पिटल बेडची संख्याट (20), डॉ. भांडकोळी हॉस्पिटल (20), जामखेड- सीआरएचपी (100), कर्जत – उपजिल्हा रुग्णालय (50), कोपरगाव- आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकमठाण (100), नगर- ग्रामीण रुग्णालय, चिचोंडी पाटील (30), नेवासा- शनैश्व र ग्रामीण रुग्णा लय शिंगणापुर (25), एफ. जे. एफ. एम. वडाळा मिशन हॉस्पिटल, वडाळा बहिरोबा (25), पारनेर – ओमकार हॉस्पिटल, सुपा (50), निरामय हॉस्पिटल, सुपा (30), पाथर्डी – उपजिल्हा रुग्णालय (50), राहाता – साईनाथ हॉस्पींटल, शिर्डी (100), राहुरी – स्वा3मी विवेकानंद नर्सिंग होम आयुर्वेद कॉलेज (50), डॉ. कोरडे हॉस्पीसटल राहुरी (13), डॉ. नेहे चाईल्डय हॉस्पीरटल राहुरी (7), श्री कृष्णाह अॅक्सीरडेंट हॉस्पी0टल राहुरी (10) असे एकूण 80 बेड. संगमनेर- संजीवनी हॉस्पीडटल संगमनेर (50), मालपाणी हॉस्पी्टल संगमनेर (50) असे एकूण 100. शेवगाव – ग्रामीण रुग्णालय शेवगाव (15), श्रीगोंदा – स्वाहमी विवेकानंद मल्टी(स्पे शॅलिस्ट हॉस्पीसटल ( 86), मोरेदादा हॉस्पीणटल श्रीगोंदा (48) असे एकूण 134. श्रीरामपूर – संत लूक्स् हॉस्पीहटल श्रीरामपूर (50) आणि अहमदनगर महानगरपालिका क्षेत्र – एआयएमएस हॉस्पीेटल (50)