जेष्ठ शेतकरी श्री. बाबुराव संभू देवखिळे यांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार
काल श्रीगोंदा तालुक्याचा दौरा करत असताना जेष्ठ शेतकरी श्री. बाबुराव संभू देवखिळे(मु.पो. नेवासा फाटा, ह.मु. पारगाव ता. श्रीगोंदा) यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५१ हजार रुपयांचा निधी माझ्याकडे सुपूर्द केला.
गेली अनेक वर्ष पंढरपूर जाणाऱ्या दिंडीला आजोबा त्यांच्या वाढदिवसानिमित्त ५१ हजार रुपयांची जेवणाची पंगत देतात.यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ९३व्या वाढदिवसाची पंगत रद्द करून ती रक्कम त्यांनी सरकारकडे जमा केली आहे.
याप्रसंगी आमदार श्री. बबनराव पाचपुते व इतर मान्यवर उपस्थित होते.