कृषी

जैनकवाडी येथे खरीप हंगाम मोहीम कार्यक्रम

किसान ओळख पत्र फार्मर आयडी प्रलंबित लाभार्थी यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन

जैनकवाडी येथे खरीप हंगाम मोहीम कार्यक्रम

किसान ओळख पत्र फार्मर आयडी प्रलंबित लाभार्थी यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन

बारामती वार्तापत्र

१ मे महाराष्ट्र दिन रोजी दिशा कृषी उन्नतीची @ २०२९ अंतर्गत खरीप हंगाम मोहीम अंतर्गत मौजे जैनकवाडी ता. बारामती जि. पुणे ग्रामपंचायत कार्यालय येथे तालुका कृषी अधिकारी बारामती श्रीमती सुप्रिया बांदल व मंडळ कृषी अधिकारी उंडवडी सुपे मनोज वाघमारे यांचे मार्गदर्शनाखाली जमीन सुपीकता निर्देशांक मृद पत्रिका वाटप करण्यात आले.

महाडीबीटी वरील योजना करता ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरणे बाबत मार्गदर्शन करण्यात आले.महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत फळबाग लागवड लाभार्थ्याचे अर्ज भरून घेतले.सूर्यफूल व करडई या क्लस्टर बेस कार्यक्रमाबाबत शेतकऱ्याची निवड व मार्गदर्शन करण्यात आले.

कृषी संवाद या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पुणे यांच्या व्हाट्सअप ग्रुप वर सहभागी होण्याचे आवाहन करून उपस्थित शेतकऱ्यांना सहभागी केले.सर्व योजना विषयी मार्गदर्शन आणि मागील वर्षी राबविणेत आलेल्या योजनांची माहिती कृषी सहाय्यक संतोष मदने यांनी दिली.

यावेळी कृषी पर्यवेक्षक उंडवडी सुपे अनंत घोळवे यांनी ॲग्री स्टॅक योजना,पि.एम.एफ.एम.इ,गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा इ. योजना बाबत मार्गदर्शन केले. तसेच किसान ओळख पत्र फार्मर आयडी प्रलंबित लाभार्थी यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घेण्याबाबत आवाहन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजीत पवार यांनी केले. सरपंच सौ.धनश्री लोखंडे जैनकवाडी या उपस्थित होत्या. त्यावेळी कृषी मित्र महादेवजी शेंडे,अरविंद पवार व ग्रामस्थ उपस्तीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!