‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ ने इंदापूर दुमदुमले
भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘जोतिबाच्या नावानं चांगभलं’ ने इंदापूर दुमदुमले
भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
इंदापूर प्रतिनिधी –
इंदापूरातील प्रसिद्ध असलेल्या जोतिबा यात्रेला भक्तगणांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून चैत्र पौर्णिमा शनिवारी (दि.12) एप्रिल रोजी सकाळपासून दख्खनचा राजाश्री जोतिबा यात्रेला उत्साहात सुरुवात झाली. यावेळी गुलालाची उधळण अन् जोतिबाच्या नावानं चांगभलंच्या जयघोषाने शहर दुमदुमले होते.
यात्रेसाठी सोलापूर, करमाळा, माढा, टेंभुर्णी फलटण माळशिरस तसेच इंदापूर तालुक्यातील पंचक्रोशीतील व नगर जिल्ह्यातून ज्योतिबा भक्त उपस्थित होते. मनोभावे भक्तांनी कुलदैवत जोतिबादेवाचे दर्शन घेतले. दुपारी 4 वाजता जोतिबाची आरती होऊन जोतिबाचा घोडा ग्राम प्रदिक्षणेसाठी सवाद्य मिरवणुकीस सुरुवात झाली.
यात्रेसाठी श्री ज्योतिबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अरविंद वाघ, गोरख शिंदे, कैलास कदम, बाबासाहेब घाडगे, गोरख कदम व यात्रा उत्सव कमिटीचे अध्यक्ष अतुल (वस्ताद) शेटे पाटील, उपाध्यक्ष संतोष जाधव, खजिनदार पोपट उंबरे, सहखजिनदार तानाजी देशमुख, कार्याध्यक्ष अभिजीत अवघडे, अक्षय सूर्यवंशी, मंदिराचे पुजारी रोहित जाधव, संदीप जाधव, अश्विन जाधव, मंगेश औताडे, हमीद आत्तार, महादेव चव्हाण, भारत बोराटे, बाळासाहेब उंबरे, बबन सूर्यवंशी, जोतिराम सूर्यवंशी यांनी यात्रा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.