इंदापूर
जो पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
इंदापूर येथे रामदास आठवलेंच वक्तव्य

जो पर्यंत देवेंद्र फडणवीस सरकार चालू देतील तोपर्यंत हे सरकार चालणार – केंद्रीय मंत्री रामदास आठवले
इंदापूर येथे रामदास आठवलेंच वक्तव्य
इंदापूर : प्रतिनिधी
आरपीआय चे अध्यक्ष खासदार रामदास आठवले हे आज पंढरपूर विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचारार्थ सुनिश्चित दौऱ्यावर असता इंदापूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी काही काळ आले होते.त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी वरील मत व्यक्त केले.
यावेळी पत्रकारांनी मा.गृहमंत्री अनिल देशमुख व सचिन वाझे प्रकरणी प्रश्न विचारला असता, केंद्रीय समाज कल्याण राज्यमंत्री खासदार रामदास आठवले म्हणाले की, सचिन वाझे प्रकरणामुळे महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली असून महाराष्ट्राची बदनामी देशभर झाली आहे.हे राज्य सरकार जोपर्यंत देवेंद्र फडणवीस चालू देतील तोपर्यंतच चालेल असे वक्तव्य यावेळी आठवले यांनी केले.