
ज्ञानसागरच्या १५ विद्यार्थ्यांना राज्य पुरस्कार
एकूण १५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण
बारामती वार्तापत्र
राज्य शासनाच्या भारत स्काऊट आणि गाईड संस्थेतर्फे राज्यस्तर पुरस्कार परीक्षा तीन दिवसीय शिबीर रामबाग येथील राज्य प्रशिक्षण केंद्रात पार पडले.
यामध्ये सावळ येथील ज्ञानसागर गुरुकुल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या एकूण १५ विद्यार्थ्यांनी परीक्षेत उत्तीर्ण होऊन राज्य पुरस्कार प्राप्त केला.
यामध्ये सानवी अमोल गुळवे, आर्या नितीन थोरात, सानिका अविनाश आवाळे, अनुष्का विजय कदम, साई श्रीकांत धालपे, समृद्धी विकास चांदगुडे, स्वरांजली अमर डोईफोडे, ओम विनोद मदने, अथर्व सोमनाथ कुंभार, ओमराज रामदास पाटील, संकेत गोकुळ जावरे, विराज शहाजी शिंदे, संकुल अजित देवकर, राजीव प्रकाश वाडकर, आरुष विनोद नितनवरे यांचा समावेश आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे व मार्गदर्शक शिक्षक प्रा. दिलीप नेवसे, सुधीर सोनवणे व शमा शिकिलकर यांचे अभिनंदन व कौतुक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर आटोळे, मानसिगं आटोळे, रेश्मा गावडे, दिपक सांगळे, पल्लवी सांगळे, दीपक बिबे,सीईओ संपत जायपत्रे, विभाग प्रमुख गोरख वनवे, मुख्याध्यापक सुधीर सोनवणे, दत्तात्रय शिंदे, नीलिमा देवकाते, राधा नाळे, निलम जगताप, रिनाज शेख यांनी केले.