ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सनी चित्रपटगृहाची शोभा वाढवली, आज त्याच व्यक्तीच्या घराची दयनीय अवस्था का?
आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?

ज्या व्यक्तीने, हाऊसफुलच्या बोर्ड्सनी चित्रपटगृहाची शोभा वाढवली, आज त्याच व्यक्तीच्या घराची दयनीय अवस्था का?
आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील?
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
महाराष्ट्राला खळखळून हसवणारे दिग्गज अभिनेते दादा कोंडके यांच्या घराची दयनीय अवस्था झाल्याकडे अभिनेता प्रथमेश परब याने लक्ष वेधलं आहे. दादा कोंडकेंच्या घराबाहेरील फोटो शेअर करत प्रथमेशने फेसबुकवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. आयुष्यभर इतरांना हसवणारे दादा, आपल्याच घराला अशा अवस्थेत पाहून हसत असतील? असा सवाल प्रथमेश परबने सोशल मीडियावरुन विचारला आहे.
काय आहे प्रथमेश परबची फेसबुक पोस्ट?
दादा कोंडके यांची कारकीर्द
अभिनेते, चित्रपट निर्माते म्हणून दादा कोंडके यांची कारकीर्द बहरली. त्यांनी मराठी वगनाट्य आणि चित्रपटांतून अभिनय केला. द्वि-अर्थी, विनोदी ढंगातील संवादफेकीमुळे त्यांच्या भूमिका लोकप्रिय झाल्या होत्या. लागोपाठ नऊ मराठी चित्रपटांच्या रौप्यम होत्सवी आठवड्यांचे ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड’ दादा कोंडके यांनी केले