ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल
काल रात्री जेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.

ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल
काल रात्री जेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना पुन्हा एकदा मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांना श्वास घेण्यात त्रास होत आहे. काल (29 जून) रात्री जेव्हा त्यांना पुन्हा एकदा त्रास होऊ लागला तेव्हा कुटुंबियांनी त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल केले (
98 वर्षीय दिलीप कुमार यांना दहा दिवसांपूर्वी मुंबईतील हिंदुजा हॉस्पिटलमधून घरी सोडण्यात आले होते. फुफ्फुसात पाणी भरल्याच्या त्रासानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. सुमारे दहा दिवसांच्या उपचारानंतर, जेव्हा त्यांना आराम वाटू लागला, तेव्हा त्यांना घरी सोडण्यात आले होते. अशा परिस्थितीत त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याच्या बातमीमुळे चाहत्यांच्या मनात खूप चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या प्रकृतीसाठी चाहते सतत प्रार्थना करत आहेत.