ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलीस स्टेशन ने दिला आधार
अखेर ज्येष्ठ दाम्पत्यास मिळाली हक्काची सदनिका ...
ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलीस स्टेशन ने दिला आधार
अखेर ज्येष्ठ दाम्पत्यास मिळाली हक्काची सदनिका …
बारामती वार्तापत्र
बारामती शहरातील अशोक नगर येथील सदनिका (फ्लॅट) भाडेकरू ने मिळवण्याचा प्रत्यन केल्यावर ज्येष्ठ दाम्पत्याने शहर पोलीस स्टेशन कडे न्याय मागण्यासाठी धाव घेतली व कर्तव्य तत्पर अधिकाऱ्यांनी लक्ष घालून सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळवून देण्याची लेखी हमी घेऊन दिली त्यामुळे आता काही महिन्यात सदर सदनिका ज्येष्ठ दाम्पत्यास मिळणार आहे.
या कामी उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ,पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे,सहायक पोलिस निरीक्षक प्रकाश वाघमारे,सहायक फौंजदार संदीपान माळी,पोलीस हवालदार अनिल सातपुते,पोलीस कॉन्स्टेबल नवनाथ शेंडगे आदी नि सहकार्य केले .
शहरातील म.ए.सो विद्यालय या ठिकाणी उपमुख्यध्यापक म्हणून काम केलेले कै श्रीकांत प्रभुणे व त्यांच्या पत्नी कै उषा प्रभूने यांच्या मालकीची सदनिका अशोक नगर येथे आहे. या सदनिका मध्ये भाडे तत्वावर शिक्षक दाम्पत्य मुलासहित राहत आहे प्रभूने पती पत्नीचे निधन झाल्यावर कायदेशीर रित्या मा .कोर्ट आदेशानुसार वारस म्हणून कै श्रीकांत प्रभूने यांचे बंधू संजय गजानन प्रभूने सासवड यांच्या नावावर सदर सदनिका झाली आहे परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिका चे भाडे देत नव्हते,विकत घ्या म्हटले तर विकत घेत नव्हते,सदनिका सोडून जावा म्हटले तर सोडून जात नव्हते त्यामुळे संजय प्रभूने यांनी अनेकांना मध्यस्थी करण्यास सांगितले, समाज्यातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनी विकत घ्या म्हणून सांगितले , पोस्टा च्या माध्यमातून नोटीस दोनदा दिली परंतु शिक्षक दाम्पत्य सदनिका सोडण्यास किंवा ताबा देण्यास तयार नव्हते व प्रभूने यांना कोणत्याच प्रकारे दाद देत नव्हते.
अखेर वैतागलेल्या प्रभूने दाम्पत्याने पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे व उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ यांची भेट घेऊन सर्व कहाणी सांगितली ,कागतपत्रे दाखवली. सर्व पुरावे व परिस्थिती पाहिल्यावर त्या शिक्षक दाम्पत्यास पोलीस स्टेशन ला बोलावून खाकी भाषा मध्ये कायद्यानुसार कारवाई होऊ शकते हे समजवून सांगितल्यावर सदर दाम्पत्याने सदर सदनिका सोडून जाण्याची व लवकरच सदनिकाचा ताबा प्रभूने दाम्पत्यास देणार असल्याची लेखी हमी दिली.
या मुळे ज्येष्ठ दाम्पत्यास शहर पोलीस स्टेशन च्या वतीने न्याय मिळाला चे समाधान वाटल्याने सदर दाम्पत्याने उपविभागीय पोलीस अधिकारी मयूर भुजबळ व पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांचे आभार मानून सन्मान केला.
चौकट:
ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक ठिकाणी विविध माध्यमातून फसवणूक होत असते ज्येष्ठ नागरिकांनी न भिता तक्रारी साठी पुढे यावे त्यांना सहकार्य करण्यासाठी बारामती शहर पोलीस स्टेशन कटिबद्ध असल्याचे शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक नामदेव शिंदे यांनी सांगितले.
फोटो ओळ: प्रभूने दाम्पत्य मयूर भुजबळ,नामदेव शिंदे यांचा सत्कार करताना