‘झिका’ संसर्गाबाबत बारामती तालुक्यातील अतिसंवेदनशील गावे यादी जाहीर
बारामती तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे.

‘झिका’ संसर्गाबाबत बारामती तालुक्यातील अतिसंवेदनशील गावे यादी जाहीर
बारामती तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे.
बारामती वार्तापत्र
राज्यात पहिला झिका रुग्ण पुणे जिल्ह्यातील बेलसर ( ता.पुरंदर ) येथे आढळून आला होता.त्यामुळे केंद्रीय आरोग्य पथकाने नुकतीच सदरील गावाला भेट देऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या होत्या.त्यानुसार जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी झिका प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी नियमावली जाहीर केली असून पुणे जिल्ह्यातील तालुकानिहाय अतिसंवेदनशील गावे जाहीर केली आहेत.. त्यामध्ये बारामती तालुक्यातील खालील गावांचा समावेश अतिसंवेदनशील म्हणून घोषित करण्यात येत आहे.
सदरील गावात कडक निर्बंध लागू राहतील
बारामती,सटवाजीनगर,आंबराई,आनंदनगर बारामती अर्बन,तांदुळवाडी.
मोरगाव,तरडोली,सुपा,सुपा २,पणदरे,काळखैरेवाडी,मोरगाव,माळेगाव विद्यानगर,सुर्यनगरी,कटफळ,शिर्राफळ.
झिका आजाराची लक्षणे सर्वसाधारणपणे डेंगू आजारासारखी असतात.यामध्ये ताप, अंगावर रॅश उमटणे,डोळे येणे,खांदे व स्नायू दुखणे,थकवा आणि डोखेदुखी यांचा समावेश आहे,ही लक्षणे सर्वसाधारणपणे सौम्य स्वरूपाची आणि ती २ ते ७ दिवसांपर्यंत राहतात.
जिल्ह्यातील ७९ गावे झिका विषाणू संसर्गाबाबत अतिसंवेदनशील म्हणून जाहीर केली यादी.