झेंडूचे दर गगनाला भिडले; इंदापूरात झेंडू फुलांना प्रति किलो ३०० ते ४०० रुपयांचा भाव
अतिवृष्टीमुळे फुलांची आवक घटली.
झेंडूचे दर गगनाला भिडले; इंदापूरात झेंडू फुलांना प्रति किलो ३०० ते ४०० रुपयांचा भाव
अतिवृष्टीमुळे फुलांची आवक घटली.
बारामती वार्तापत्र
विजयादशमी,दसरा आणि झेंडूची फुले यांचे समीकरण असल्यामुळे दसरा सणासाठी इंदापूर शहरातील अनेक महत्त्वाच्या रस्त्यावर पिवळ्या, केशरी झेंडूसह शेवंतीच्या फुलांच्या राशी पडल्या आहेत.
यंदा करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सगळेच सण-उत्सव साध्या पध्दतीने साजरे होत आहेत. त्यातच अलीकडेच झालेल्या अतिवृष्टी व पुरामुळे झेंडू फूल शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यामुळे फुलांची आवक खूपच घटली असून आवक कमी आणि मागणी जास्त यामुळे झेंडूचा दर गगनाला भिडले आहेत.
दसऱ्याच्या सणासाठी झेंडूच्या फुलांसह आपट्याच्या पानांना मोठी मागणी असल्याने शहरातील मुख्य बाजारपेठेसह विविध ठिकाणी फुले खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होती. झेंडूच्या फुलांना ३०० ते ४०० रुपये;किलो दर मिळाल्याने यंदा झेंडूच्या फुलांनी ‘भाव’ खाल्ला.