टी.सी. महाविद्यालयात जाहिरात निर्मिती विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न
पहिल्या ३ जाहिरातींना पारितोषिके देण्यात आली.
टी.सी. महाविद्यालयात जाहिरात निर्मिती विषयावर पाच दिवसीय कार्यशाळा संपन्न
पहिल्या ३ जाहिरातींना पारितोषिके देण्यात आली.
बारामती वार्तापत्र
उद्योग क्षेत्रामध्ये जाहिरातीशिवाय कोणताही तग धरू शकत नाही. जाहिरात निर्मितीची प्रक्रियाही सृजनात्मक आहे.
विद्यार्थ्यांना जाहिरात निर्मिती क्षेत्रामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी टीसी कॉजेलमध्ये पाच दिवसीय जाहिरात निर्मिती कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
महाविद्यालयातील ई-कॉमर्स एन्ड डिजीटल मार्केटिंग विभागामार्फत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. जाहिरात निर्मिती कार्यशाळा दिनांक 9 ते 14 फेब्रुवारी दरम्यान पार पडली. प्रा. दिपक महामुनी आणि त्यांच्या संपूर्ण टिमने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
जाहिरात निर्मिती कार्यशाळेचे उद्घाटन महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अजित तेळवे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉ. जनार्दन पवार उपस्थित होते. प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी दुस-या सत्रामध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर शिक्षण, संभाषण कौशल्य आणि सृजनशीलतेचा वापर करावा असा सल्ला प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
पाच दिवस चाललेल्या या कार्यशाळेच्या पहिले दोन दिवस आशय देशपांडे यांनी विद्यार्थ्य़ांना व्हिडीओ एडिटिंग या विषयावर मार्गदर्शन केले. तर कार्यशाळेच्या तिस-या दिवशी प्रा. दिपक महामुनी, सौरभ महामुनी आणि श्रृती महामुनी यांनी ध्वनीमुद्रण कलेविषयी मार्गदर्शन केले. जाहिरातींच्या सिनेमॅटोग्राफीविषयी मयुर चव्हाण यांनी कार्यशाळेच्या चौथ्या दिवशी मार्गदर्शन केले. पांडूरंग वाघमारे यांनी युट्यूब जाहिरात आणि मॉनेटायझेनविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.
तर शेवटच्या दिवशी विद्यार्थ्यांना प्रोजक्ट देण्यात आले होते. यामध्ये पहिल्या ३ जाहिरातींना पारितोषिके देण्यात आली.
जाहिरात निर्मिती कार्यशाळेचे समन्वयक प्रा. सिद्धार्थ सोरटे सर यांनी सुत्रसंचालन केले. संपूर्ण कार्यशाळेसाठी मोलाचे मार्गदर्शन महाविद्यालयाचे सेक्रेटरी मिलिंद शहा वाघोलीकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरूमकर सर तसेच महाविदयालयाचे रजिस्ट्रार अभिनंदन शहा यांनी केले.