टी.सी. महाविद्यालयामध्ये रंगणार अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धा
अखिलभारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये देशभरातील 19 विद्यापीठांचे संघसहभागी होणार
टी.सी. महाविद्यालयामध्ये रंगणार अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धा
अखिलभारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये देशभरातील 19 विद्यापीठांचे संघसहभागी होणार
बारामती वार्तापत्र
बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद कॉलेजलायंदाच्या वर्षी होणा-य़ा अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉलस्पर्धेचे आय़ोजनकरण्याचा बहुमान मिळाला आहे.असोशिएशन ऑफ इंडियन युनिव्हर्सिटीज आणिसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या मान्यतेने ही स्पर्धा आयोजित करण्यात येतआहे.
शनिवार,दिनांक 20मार्च 2022 ते 24 मार्च 2022 दरम्यान या स्पर्धा महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर आय़ोजित करण्यात येणार आहेत. अखिलभारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेमध्ये देशभरातील 19 विद्यापीठांचे संघसहभागी होणार आहेत.
या स्पर्धेसाठी सुमारे 400 खेळाडू, संघव्यवस्थापक, क्रीडा अधिकारी, मार्गदर्शक, पंच,शारीरिक शिक्षण संचालक सहभागी होणार आहेत.
मुळचा युरोपीयन असलेला कॉर्फबॉल हाक्रीडाप्रकार हा जगभरातील एक अतिशय आकर्षक व खेळाडूंच्या सांघिक क्षमतेला पूर्ण वाव देणारा खेळ आहे.कॉर्फबॉल ही एकमेव अशी स्पर्धा आहे की ज्यामध्ये मुले-मुली यांचा एकत्र सहभागअसतो. जगभरात जवळपास ६० देशांमध्ये हा खेळ खेळला जातो. बास्केटबॉल आणि नेटबॉल या दोन खेळांशी साम्य असलेला हा क्रीडाप्रकारआहे. तसेच याच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा भरविल्या जातात.
गेल्या काही वर्षांपासून भारतामध्ये देखील मोठ्याप्रमाणावर हा खेळ खेळला जातोय. एका संघामध्ये १६ खेळाडू भाग घेतात. त्यामध्ये८ मुले आणि ८ मुलींचासहभाग असतो. मात्र प्रत्यक्ष सामन्यामध्ये ४ मुले आणि ४ मुली एका संघाकडून खेळतात. या वर्षीच्या स्पर्धेमध्ये प्राथमिक फेरीतील सामने बाद पद्धतीने खेळविले जातील व अंतिम चार संघ हे साखळी पद्धतीने अंतिम फेरीत खेळतील.
यातील अंतिम सामना दि. 24 मार्च रोजी सायंकाळी खेळविला जाईल व त्यानंतर या स्पर्धेचा समारोप होईल.
अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेचे उद्घाटन सोमवार दिनांक 21 मार्च 2022 रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. एन.एस उमराणी यांचे शुभहस्ते होणार आहे. अनेकान्त एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष मा.जवाहर शाह (वाघोलीकर) समारंभाचे अध्यक्षस्थान भुषवित आहेत.
तर संस्थेचे सचिव श्री. मिलींद वाघोलीकर यांची सन्मानीय उपस्थिती असेल. कार्यक्रमासाठी श्री. प्रफुल्ल पवार, रजिस्ट्रार, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डॉ.दिपक माने, संचालक, बोर्ड ऑफ स्पोर्टस, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच विद्यापीठातील अनेक अधिकारी, आसपासच्या परिसरातील महाविद्यालय, शाळांमधील विद्यार्थी, क्रीडा शिक्षक, राष्ट्रीय पातळीवरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
तसेच जानेवारी 2018-19 मध्येहीअखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉल स्पर्धेचे यशस्वी आयोजन केले होते. अखिल भारतीय आंतर-विद्यापीठीय बेसबॉल स्पर्धांचे आय़ोजनाचा मान टीसी कॉलेजला मिळाला आहे.अखिल भारतीय आंतर-विद्यापीठ कॉर्फबॉलस्पर्धेची जय्यत तयारी चालू असल्याचे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रशेखर मुरुमकर यांनी सांगितले. प्रा.गौतम जाधव हे या स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पाहत आहेत.