टी. सी. महाविद्यालयामध्ये आविष्कार स्पर्धा संपन्न
विभागीय आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प आविष्कार २०२४ स्पर्धेचे आयोजन

टी. सी. महाविद्यालयामध्ये आविष्कार स्पर्धा संपन्न
विभागीय आंतरमहाविद्यालयीन संशोधन प्रकल्प आविष्कार २०२४ स्पर्धेचे आयोजन
बारामती वार्तापत्र
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय,
बारामती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २७ नोव्हेंबर २०२४ रोजी विभागीय आंतरमहाविद्यालयीन
संशोधन प्रकल्प आविष्कार २०२४ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य
डॉ.अविनाश जगताप यांच्या हस्ते सकाळी १० वाजता या स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. या
स्पर्धेकरिता विभागीय स्तरावरील ३५ विविध महाविद्यालयातून एकूण १३६ विद्यार्थी स्पर्धक सहभागी
झाले होते, त्यांनी ७८ पोस्टर सादर केले.
स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा महाविद्यालयाच्या जीवराज सभागृहामध्ये सायंकाळी ४ वाजता पार पडला. संशोधन हे सकारात्मक आणि माणसाला जीवनदान देणारे असावे. विद्यार्थ्यांमध्ये खूप कौशल्ये आहेत, त्यांची संशोधक वृत्ती जोपासली पाहिजे असे उदगार पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. देविदास वायदंडे यांनी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत असताना काढले. सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ संशोधनाला प्राधान्य देते असेही यावेळी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्षपद महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डॉ.अविनाश जगताप यांनी भूषविले. ‘
विदयार्थी, संशोधक, संशोधन संस्था आणि शैक्षणिक संस्था यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोनातून संवाद रहावा याकरिता २००६ साली महाराष्ट्र शासनाने अविष्कार या नावाने ही स्पर्धा सुरु केली. यावर्षी हा मान टी. सी. कॉलेजला मिळाला, त्याबद्दल मी विद्यापीठाचे आभार मानतो. संशोधक विद्यार्थ्यांनी कष्ट करण्याची तयारी ठेवावी आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा असे अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना प्राचार्य म्हणाले.
स्पर्धेसाठी मानव्यविद्या, भाषा, ललित कला तर वाणिज्य व्यवस्थापन आणि कायदा आणि विज्ञान शाखा असे तीन विषय होते. स्पर्धेच्या नियमांनुसार विविध महाविद्यालयातील पदवी, पदव्युत्तर आणि संशोधनाचे विदयार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यामध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय असे एकूण २७ पारितोषिक देण्यात आले. अनेकांत एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जवाहर शहा वाघोलीकर, सचिव मिलिंद शहा वाघोलीकर आणि सर्व सदस्यांनी स्पर्धेसाठी विदयार्थ्याना शुभेच्छा दिल्या. पारितोषिक वितरण सोहळ्याची सुरूवात विद्यापीठ गीताने करण्यात आली. पारितोषिक वितरण
समारंभाच्या सुरूवातीला महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. अशोक काळंगे यांनी उपस्थित मान्यवर आणि सहभागी स्पर्धकांचे स्वागत आणि कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. या स्पर्धेला परीक्षक म्हणून डॉ.एम.ए. लाहोरी, प्रा.शुभांगी शिंदे, डॉ.जयश्री बागवडे, डॉ. नितीन जाधव, डॉ.प्रशांत शिंदे, डॉ.अमर भोसले डॉ.प्रवीण ताटे उपस्थित होते. एआरसी प्रमुख डॉ. श्रीकृष्ण साळुंके यांनी स्पर्धेचे समन्वयक म्हणून काम पहिले. विदयार्थी, प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या सोहळ्याचे सूत्रसंचालन डॉ. विवेक बळे यांनी केले. एआरसी प्रमुख डॉ. श्रीकृष्ण साळुंके यांनी आभार मानले.