टी 20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात श्रीलंका संघाने नामबिया संघावर 7 विकेट्सनी विजय मिळवला
या सामन्यात संघाचा कर्णधार दासून शनाकाने घेतलेला एक झेल पाहण्याजोगा आहे.
टी 20 विश्वचषकाच्या ग्रुप स्टेजेसच्या सामन्यात श्रीलंका संघाने नामबिया संघावर 7 विकेट्सनी विजय मिळवला
या सामन्यात संघाचा कर्णधार दासून शनाकाने घेतलेला एक झेल पाहण्याजोगा आहे.
प्रतिनिधी
टी20 विश्वचषकाच्या सामन्यांना सुरुवात होऊन दोनच दिवस झाले असले तरी दररोज काहीतरी हटके पाहायला मिळत आहे.18 ऑक्टोबर) दुपारच्या सामन्यात आयर्लंडचा गोलंदाज कर्टिस कँफर याने नेदरलँडच्या 4 फलंदाजाना सलग 4 चेंडूवर तंबूत धाडलं. त्यानंतर सायंकाळच्या सामन्यात श्रीलंकेचा कर्णधार याने नामबियाच्या एका फलंदाचा पकडलेला झेल हा तर डोळ्याचे पारडे फेडणारा ठरला. त्याने ज्याप्रकारे हा झेल घेतला तो पाहून सर्वच चकीत झाले. अगदी झेप घेत घेतलेल्या या झेलाचा व्हिडीओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
सामन्यात प्रथम नाणेफेक जिंकत श्रीलंका संघाने गोलंदाजी निवडली. हा निर्णय संघाच्या गोलंदाजानी अगदी बरोबर ठरवत नामबियाच्या संघाला अवघ्या 96 धावांत सर्वबाद केलं. त्यांच्याकडून केवळ क्रेग विल्यम्स आणि इरॉसमस यांनी अनुक्रमे 29 आणि 20 य़ा सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंका संघाकडून थिकशानाने 3 तर एल कुमारा आणि वनिंदू हसरंगा यांनी प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. करुनारत्ने आणि चमिरा यांनी 1-1 विकेट घेतला.
श्रीलंकेचा 7 गडी राखून विजय
97 धावांचे आव्हान पूर्ण करण्यासाठी मैदानात आलेल्या श्रीलंका संघाने सुरुवात थोडी खराब केली. सलामीवीर निसांका आणि परेरा 5 आणि 11 धावा करुन बाद झाले. चंडिमाल हाही 5 धावाच करु शकला. पण त्यानंतर आलेले फलंदाज आविष्का फर्नांडो (नाबाद 30) आणि भानुका राजपक्षा (नाबाद 42) यांनी धमाकेदार फलंदाजी करत संघाला 13.3 ओव्हरमध्येच 7 गडी राखून विजय मिळवून दिला.
एकाहाती झेल
नामबियाचा डाव संपत आला असताना 19 व्या षटकात रुबेल ट्रम्पलमॅन याचा अप्रतिम असा झेल श्रीलंकेचा कर्णधार दासून शनाकाने पकडला. यावेळी चामिरा गोलंदाजी करत असताना रुबेलने मारलेला शॉट चूकला त्यामुळे चेंडू अगदी जवळच पडणार त्यावेळी लांबून पळत येऊन शनाकाने झेप टाकत अक्षरश: एका हातात झेल पकडला.