
टेक्निकल विद्यालयाचा चित्रकलेचा निकाल 100%
57 विद्यार्थी परीक्षेस बसले
बारामती वार्तापत्र
बारामती मधील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयाचा एलिमेंटरी व इंटरमिजीएट या दोन्ही चित्रकला परीक्षा निकाल 100% लागला.सप्टेंबर 2024 मध्ये या दोन्ही शासकीय रेखाकला ग्रेड परीक्षा घेतली गेली होती.
यातील एलिमेंटरी परीक्षेत 57 विद्यार्थी परीक्षेस बसले होते.त्यातील अ श्रेणीत 29,ब श्रेणीत 24 तर क श्रेणीत 4 विद्यार्थी पास झाले.तर इंटरमिजीएट या परीक्षेसाठी 40 विद्यार्थी बसले होते.
त्यातील अ श्रेणीत 14, ब श्रेणीत 17 तर क श्रेणीत 9 विद्यार्थी पास झाले.या सर्व विद्यार्थ्यांची तयारी विभागप्रमुख श्रीमती सुजाता गाडेकर,श्रीमती रुपाली तावरे यांनी करून घेतली.या सर्व पास विद्यार्थांचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य श्री कल्याण देवडे तसेच स्थानिक स्कूल कमिटी चे सदस्य सदाशिव (बापू) सातव यांनी केले.