टेक्निकल विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा
covid19 च्या नियमांचे पालन करून
बारामती वार्तापत्र
बारामती येथील राधेश्याम एन आगरवाल टेक्निकल विद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.विद्यार्थांमध्ये मतदान करण्याविषयी व लोकशाही विषयी जागरूकता निर्माण होण्यासाठी इ 9 वी ते 12 वी च्या विद्यार्थ्यांची निबंध व चित्रकला स्पर्धा आयोजीत करण्यात आली होती.
या उपक्रमामध्ये विद्यालयातील विद्यार्थानी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.तसेच covid19 च्या नियमांचे पालन करून विद्यार्थानी व उपस्थित शिक्षक यांनी जागरूक मतदार ची प्रतिज्ञा म्हटली.2011 पासून संपूर्ण राष्ट्रीय स्तरावर मतदार दिनाचे आयोजन करण्यात येते.यावेळी विद्यालयातील उपशिक्षक श्री हनुमान राठोड यांनी राष्ट्रीय मतदार दिनाविषयी सविस्तर माहिती सांगितली तर प्रतिज्ञाचे वाचन विद्यालयातील उपशिक्षक श्री सुदाम गायकवाड यांनी केले.सदर कार्यक्रमास विद्यालयाचे प्राचार्य श्री झाकीर शेख,उपमुख्याध्यापक श्री कल्याण देवडे ,पर्यवेक्षक श्री रमेश जाधव व विद्यालयातील सर्व शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.