टेक्निकल हायस्कूल मध्ये करिअर डे उत्साहात साजरा
करिअर डे साजरा
बारामती वार्तापत्र
विद्यार्थ्यांना दहावीनंतर काय ?याविषयी बऱ्याच वेळा प्रश्नचिन्ह निर्माण झालेले असते मात्र यावर जर अगोदरच मार्गदर्शन झाले किंवा करिअरच्या वाटा संधी यांविषयी मार्गदर्शन लाभले तर विद्यार्थ्यांना निश्चित मार्ग सापडतो त्यामुळे टेक्निकल हायस्कूल मध्ये करिअर डे साजरा करण्यात आला.
कर्मवीर विद्या प्रबोधिनी व करिअर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला या कार्यक्र मा निमित्त आयोजित व्याख्यानमालेत एस सी जगताप एस एस नामदे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य काकडे सर होते
विद्यार्थ्यांना दहावीनंतर करिअरच्या संधी व करिअर निवडताना लक्षात घ्यावयाच्या बाबी या विषयावर एस सी जगताप यांनी मार्गदर्शन केले ए वाय होलमुखे यांनी मार्गदर्शन केले या कार्यक्रमास उपमुख्याध्यापक मोहिते सर पर्यवेक्षक बाबर सर यांच्यासह सर्व शिक्षक उपस्थित होते