ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन
निषेध व्यक्त करत दिल्या घोषणा

ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावरील भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन
निषेध व्यक्त करत दिल्या घोषणा
इंदापूर : प्रतिनिधी
ठाणे महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ इंदापूर नगरपरिषदेच्या कर्मचार्यांकडून मंगळवारी ( दि.३१ ) या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करत एक दिवस काम बंद आंदोलन पुकारले आहे.
दि.३० ऑगस्ट रोजी ठाणे महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे या आपले कर्तव्य बजावत असताना माथेफिरुकडून त्यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला होता.यामध्ये त्यांच्या हाताची बोटे कापली गेली.तसेच डोक्याला देखील मोठी दुखापत झाली होती. आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावणाऱ्या या महिला अधिकाऱ्यावर झालेला भ्याड हल्ल्या अत्यंत संतापजनक आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक जेव्हा कर्तव्य बजावणाऱ्या अधिकार्यांवर हल्ले करतात,तेव्हा अशा प्रकारच्या हल्ल्याने केवळ हल्ला झालेला अधिकारीच नव्हे तर संपूर्ण प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची होते. त्यामुळे अशा प्रकारच्या हल्ल्याचा संघटित निषेध करणे आणि हल्लेखोरांवर कठोर कारवाई करणे हाच उपाय आहे असे मत इंदापूर नगरपरिषद कामगार संघटनेकडून व्यक्त करण्यात आले.
यावेळी बोलताना प्रशासकीय अधिकारी वर्षा क्षिरसागर म्हणाल्या की, कल्पिता पिंपळे आपले कर्तव्य बजावत असताना माथेफिरूने केलेल्या भ्याड हल्ल्यात त्यांच्या हाताची बोटे गेली व त्यांच्या डोक्याला देखील जखम झाली. कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडणार्या महिला अधिकाऱ्यावर झालेल्या हल्ल्याचा इंदापूर नगरपरिषदेकडून आम्ही निषेध दर्शवून एकदिवसीय काम बंद आंदोलन करत आहोत.
तसेच कामगार नेते मोहन शिंदे म्हणाले की, ठाणे महापालिकेच्या उपायुक्त कल्पिता पिंपळे या महिला अधिकाऱ्यावर हल्ला करण्यात आला त्याच्या निषेधार्थ इंदापूर नगर परिषदेचे कामकाज एक दिवस बंद ठेवण्यात आले आहे. इथून पुढे असे कृत्य करण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांना कायदेशीर मार्गाने धडा शिकवू. गावाचे रक्षण,व स्वच्छता करणाऱ्यांवर घरात बसून उटण्याने आंघोळ करणारे हल्ले करतात इथून पुढे हे कदापिही खपवून घेतले जाणार नाही.
दरम्यान विविध घोषणा बाजी देत निषेध व्यक्त करण्यात आला.यावेळी इंदापूर नगरपरिषदेचे सर्व अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होता.