“डब्ल्यू टी एफ” च्या वतीने जागतिक योगा दिन साजरा.
'रियल हेल्थ इन योगा' हा विचार सर्वदूर पोहचविण्याचा निर्णय.
“डब्ल्यू टी एफ” च्या वतीने जागतिक योगा दिन साजरा.
‘रियल हेल्थ इन योगा’ हा विचार सर्वदूर पोहचविण्याचा निर्णय
बारामती:वार्तापत्र जागतिक योगा दिन निमित्त विविध योगासने,प्राणायम करीत व योगाची माहिती देत योगा दिन साजरा केला.
योगा ची निर्मिती व धकाधकीच्या जीवनात योगाचे मानवी जीवनास होणारे फायदे त्या साठी योगासने व ध्यानधारणा महत्वाची आहे असे सांगत व योगा विषयी माहिती पुस्तके वाटून जागतिक योगा दिन डब्ल्यू टी एफ (वुई द फुवचर ग्रुप) संस्थेचे वतीने रविवार 21 जून रोजी सकाळी सात वाजता साजरा करण्यात आला.या प्रसंगी अध्यक्ष राजेश मेहता यांनी प्रास्ताविक करून योगासने प्रात्याक्षिक सादर केली.
” रोज सकाळी नीरा डावा कालवा शेजारील भरावावर चालणे,पळणे,हास्य क्लब आणि योगासने केली जातात विविध क्षेत्रातील अधिकारी,व्यवसाईक,कामगार आदी मंडळी याचा लाभ घेतात . तणावमुक्त जीवन जगण्यासाठी डब्ल्यू टी एफ संस्था सहकार्य करते व पर्यावरण वाचवा या विषयी संदेश सर्वदूर जावा या उद्देशाने शैक्षणिक सहल आयोजित केली जाते,विविध सामाजिक क्षेत्रात कार्य केले जाते जाते असेही राजेश मेहता यांनी सांगितले.स्वागत राजेंद्र वणवे,आभार दादासाहेब माने यांनी मानले तर चारुदत्त पेंढारकर यांनी ‘योग व भारत देश ‘ या विषयी सविस्तर माहिती दिली.
या वेळी डब्ल्यू टी एफ चे सकाळी व संध्याकाळी योगासने व व्यायाम करण्यासाठी येणारे सभासद उपस्तीत होते.