डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील म्होरक्या जेरबंद डिझेल चोरीचे १० गुन्हे उघडकीस व १४,००,०००/- मुद्देमाल जप्त
टोळीकडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता

डिझेल चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील म्होरक्या जेरबंद डिझेल चोरीचे १० गुन्हे उघडकीस व १४,००,०००/- मुद्देमाल जप्त
टोळीकडून जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता
क्राईम; बारामती वार्तापत्र
दिनांक ३०/०८/२०२१ रोजी मौजे पारगाव ता.दौंड जि.पुणे गावचे हद्दीतून फिर्यादी सचिन अरुण बोत्रे, रा.पारगाव, ता.दौंड, जि.पुणे ट्रकचे टाकीचे झाकन खोलून त्यातील ५०० लिटर डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरी केली होती.
राजवीर गजराजसिंग मल्होत्रा,( वय 36, सध्या रा. गावडेवाडी केसनंद ता. हवेली, जि पुणे. मुळ रा.दिल्ली ) असे या डिझेल चोरीच्या टोळीतील म्होरक्याचे नाव आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पारगाव येथील सचिन अरूण बोत्रे यांच्या ट्रकच्या डिझेल टाकीचे झाकण उघडून 500 लिटर डिझेल 30 ऑगस्ट 2021 रोजी अज्ञात चोरांनी चोरून नेल्याची फिर्याद यवत पोलीस स्टेशनला दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर दौंडसह जिल्हयात रस्त्यावर,घरासमोर,हॅाटेल,ढाब्यासमोर थांबलेल्या वाहनांमधून डिझेल चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठी वाढ झाली होती.
त्यानुसार यवत पोलीस स्टेशनच्या पथकाने आरोपी नामे राजवीर गजराजसिंग मल्होत्रा, वय ३६ वर्षे, सध्या रा.गावडेवाडी केसनंद, ता.हवेली, जि.पुणे मुळ रा.दिल्ली यास ताब्यात घेऊन त्याचे इतर चार साथीदार निष्पन्न केले असून, आरोपी कडून १००० लिटर डिझोल, एक ग्रे रंगाची इंडिवर एम.एच १४ ए.एल ०००१, एक चॉकलेटी रंगाचा आयशर टेम्पो आर.जे. ४० जी.ए. ०३३९, असा एकूण १४,००,०००/- (चौदा लाख) रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून
आरोपी कडून खालील प्रमाणे डिझेल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत,
१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ७५४/२०२१, भा.द.वि.कलम ३७९
२) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ८०८/२०२१, भा.द.वि.कलम ३७९
३) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ३००/२०२१, भा.द.वि.कलम ३७९
४) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं, २४१ /२०२०, भा.द.वि.कलम ३७९
५) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ६००/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
६) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ६०७/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
७) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ७८५/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
८) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ७९९/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
९) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. १०१०/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
१०) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ११९४/२०२०, भा.द.वि.कलम ३७९
सदरची कामगिरी मा.डॉ.अभिनव देशमुख, पोलीस अधीक्षक सो, पुणे ग्रामीण अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोसई पदमराज गंपले, सहा.फौज जयसिंग जाधव, पो.हवा निलेश कदम, पो.हवा. गुरूनाथ गायकवाड, पो.ना.महेंद्र चांदणे, पो.ना रामदास जगताप, पो.ना विकास कापरे, पो.ना विशाल जाधव, पो.शि. राहुल गडदे, पो.शि गणेश भापकर, पो.शि भारत भोसले, पो.शि निखिल रणदिवे, पो.शि मारूती बाराते यांचे पथकाने केलेली आहे.