डुप्लिकेट नंबर प्लेट टाकून गाडी मिरवणार्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.

डुप्लिकेट नंबर प्लेट टाकून गाडी मिरवणार्याला पोलिसांनी घेतलं ताब्यात
पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाची कारवाई.
क्राईम;बारामती वार्तापत्र
डुप्लिकेट नंबर टाकून गाडी वापरत असणाऱ्या विशाल विकास अहिवळे (वय २४ वर्षे) (रा. रेल्वे कॉलनी सोमनथली ता. फलटण जि सातारा) यास पुणे ग्रामिणच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ताब्यात घेत कारवाई केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार , (दि:२८) रोजी बारामती विभागात पेट्रोलिंग करीत असताना बारामती येथे एक इसम डुप्लिकेट नंबर टाकून होंडा कंपनीची युनिकॉन गाडी वापरत असल्याचे गोपनीय बातमी पोलिसांना मिळाली. दरम्यान पोलिसांनी सदर गाडीचा शोध लावत विशाल विकास अहिवळे (रा रेल्वे कॉलनी सोमनथली ता फलटण जि सातारा) यास ताब्यात घेतले.
दरम्यान त्याच्याकडे काळ्या रंगाची होंडा युनिकॉन गाडी मिळून आली. त्यावर त्याने दुसऱ्या गाडीचा नंबर प्लेट लावून फिरत होता. पोलीसांनी त्याच्या गाडीचा इंजिन नंबर आणि चासिस नंबर चेक केला असता सदरील गाडी चा ओरिजनल नंबर (एम एच ४२ ए पी ५४१९) असल्याचे समजले.
त्यावरून मूळ मालक यांना सम्पर्क करून गाडी चोरी गेली आहे का याबाबत चौकशी केली असता मूळ मालकाने १५ एप्रिल २०१९ रोजी सुपा येथून गाडी चोरीस गेली असल्याचे सांगितले. गाडी चोरी प्रकरणी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशनला गु र नं १९७/२०१९ भा द वी ३७९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदरील गाडी आणि आरोपी विशाल विकास अहिवळे यास ताब्यात घेत गुन्ह्यात पुढील तपासकामी वडगाव निंबाळकर पोलिस स्टेशन च्या ताब्यात देण्यात आले आहे .