बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न
मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधावा

बारामतीतील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीची सौ. निर्मला हरिभाऊ देशपांडे प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन संपन्न
मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधावा
बारामती वार्तापत्र
शनिवार दिनांक २८/ १२/ २०२४ रोजी शाळेच्या सभागृहात उत्साहाने पार पडले. स्नेहसंमेलन दोन विभागात घेण्यात आले. सकाळी इयत्ता पहिली दुसरीच्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मा. श्री. सुभाष वणवे (केंद्र समन्वयक बारामती नगरपरिषद) हे उपस्थित होते.
त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. वंदना वणवे याही उपस्थित होत्या. तर दुपारी इयत्ता तिसरी चौथीच्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे मा. डॉ.अतुल भुजबळ तसेच शालासमिती अध्यक्ष मा. श्री. अजय पुरोहित, शालासमिती महामात्र मा.डॉ.गोविंद कुलकर्णी शाला समन्वयक पी. बी. कुलकर्णी तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका मा. अनिता तावरे, पूर्व प्राथमिक विभाग कार्याध्यक्षा सौ. चित्रा फडतरे व प्राथमिक विभाग कार्याध्यक्षा सौ. प्रतिभा कदम तसेच मतदान पद्धतीने निवडलेले विद्यार्थी प्रतिनिधी कु. अनया दिलीप मोरे व चि. यशराज फत्तेसिंह भापकर उपस्थित होते.
प्राथमिक विभाग मुख्याध्यापिका मा. सौ. मोनिका खेडलेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच शाळेत होणारे उपक्रम, स्पर्धा, प्रकल्प, शाळेने विविध क्षेत्रात मिळवलेली उत्तुंग कामगिरी याबाबतचा अहवाल सादर केला.
जाणीव पर्यावरणाची’ या उपक्रमाला धरून स्नेहसंमेलन घेण्यात आले. विद्यार्थी, पालक रिक्षावाले काका यांच्यासाठी या उपक्रमाला अनुसरून स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्याचे पारितोषिक वितरणही या कार्यक्रमात उपस्थित प्रमुख पाहुणे व शाळेचे माजी विद्यार्थी मा. डॉक्टर अतुल भुजबळ यांच्या हस्ते झाले.
काळाची गरज लक्षात घेऊन समाजात पर्यावरण रक्षण करण्याची, जागृती निर्माण होऊन त्या पद्धतीची जीवनशैली ही अंगीकृत करण्याची जाणीव करून देणे हा यामागील उद्देश होता.
म.ए.सो. प्राथमिक शाळा ही पंचक्रोशीत नामांकित शाळा असून मी या शाळेचा माजी विद्यार्थी असल्याचा अभिमान वाटतो तसेच या शाळेचा विद्यार्थी नेहमी उठून दिसतो. याचे कारण इथे मिळणारे संस्कार, शिक्षण व काळाच्या पावलानुसार विद्यार्थ्यांना होणारे मार्गदर्शन फार महत्त्वाचे आहे.
असे सांगून मा. डॉ. अतुल भुजबळ यांची तिसरी पिढी या शिक्षण घेत असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले. शाळेच्या कामगिरीविषयी यशाविषयी त्यांनी कौतुक केले.
शाळा समिती महामात्र मा. गोविंद कुलकर्णी यांचा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरवण्यात खूप मोलाचा वाटा आहे. त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाबाबत पहिली कार्यशाळा बारामतीतील सर्व शाळांसाठी घेतली व त्याबाबत आपली शाळा करत असणारे उपक्रम याविषयी माहिती दिली.
स्नेहसंमेलन अध्यक्ष मा. श्री. अजय पुरोहित सर यांनी मुलांच्यातील संशोधक वृत्ती, पाठांतर वाढीस लागण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी प्रयत्न करावे.विशेषत: गणपती अथर्वशीर्ष त्याचा अर्थ मुलांना सांगावा.मारुतीस्तोत्र पाठांतर घ्यावे तसेच पालकांनी मुलांना वेळ देऊन त्यांच्याशी संवाद साधावा असा संदेश दिला.
यानंतर ‘जाणीव पर्यावरणाची’ या उपक्रमा अंतर्गत विविध गुणदर्शन कार्यक्रम विद्यार्थ्यांनी सादर केला. यात नाटक, गीत, भारुड, कविता, नृत्य, घोषवाक्यसह सादर करून विद्यार्थ्यांनी पर्यावरण वाचवा हा संदेश दिला.
या कार्यक्रमात शाळा समितीचे अध्यक्ष मा. श्री. अजय पुरोहित शाळेचे महामात्र मा. डॉ. गोविंद कुलकर्णी शाळेच्या मा. मुख्याध्यापिका सौ.मोनिका खेडलेकर यांचे बहुमोल व प्रेरणादायी मार्गदर्शन शुभेच्छा लाभल्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचाल Name न सौ. मंजिरी दोशी यांनी केले तर आभार स्नेहसंमेलन कार्याध्यक्षा सौ. प्रतिभा कदम यांनी मानले.