पुणे

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात एक मोठी बातमी;प्रत्यक्ष साक्षीदाराने दोन शूटरला ओळखले!

खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणा संदर्भात एक मोठी बातमी;प्रत्यक्ष साक्षीदाराने दोन शूटरला ओळखले!

खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019 मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे.

पुणे, प्रतिनिधी

अंधश्रद्धा निर्मुलन समितीचे कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोळकर यांच्या खून प्रकरणाबाबत महत्त्वाची बातमी आहे. प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने खुनाचा आरोप असलेल्या सचिन अंदुरेआणि शरद कळसकर यांना ओळखले आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणात मोठी घडामोड आज घडली आहे. आज पुणे जिल्हा सत्र न्यायालयात दाभोलकर हत्या प्रकरणातील साक्षीदारासमोर आरोपींची ओळख परेड घेण्यात आली आहे. यात साक्षीदाराने दाभोलकर यांच्या खून प्रकरणातील दोन्ही आरोपींना ओळखले आहे.प्रत्यक्षदर्शी साक्षीदाराने आज पुणे न्यायालयात आरोपी सचिन अंदुरे आणि शरद कळसकर यांना खून करताना पाहिले असल्याचा कबुली जबाब दिला आहे. साक्षीदाराने या दोघांना ओळखत न्यायालयात त्या घटनेची संपूर्ण माहिती दिली आहे.

उर्वरित पुढील ओळख परेड ही 23 मार्चला होईल. याप्रकरणी वीरेंद्र तांवडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर आरोपी आहेत. यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी न्यायालयात प्रत्यक्ष हजर होते. हत्येतील पाच आरोपींवर शिवाजीनगर येथील नावंदर कोर्टात सी.बी.आय मार्फत 15 सप्टेंबर 2021 रोजी आरोपपत्र निश्चित झाले आहेत.

आज साक्षीदारांच्या समोर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात केवळ अर्धीच ओळख परेड झाली आहे. उर्वरित पुढील ओळख परेड होणार 23 मार्चला होणार आहे.नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्ये प्रकरणात वीरेंद्र तांवडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर विक्रम भावे आणि संजीव पुनाळेकर असे एकूण पाच आरोपी आहेत.यातील संजीव पुनाळेकर वगळता सर्व चार आरोपी होते. ते न्यायालयात आज प्रत्यक्ष हजर होते.

या प्रकरणी अनेक वर्षांपासून तपास पूर्ण झाल्यानंतर ‘सनातन’ संस्थेशी संबंधित डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाचही आरोपींवर आरोप निश्चित करण्यात आली होती. याच प्रकरणी न्यायालयात खटला सुरु आहे. न्यायालयात सध्या साक्षीदारांचे साक्ष नोंदविणे सुरु आहे. पुणे महापालिकेत काम करणाऱ्या एका प्रत्यक्षदर्शीचा आज साक्ष नोंदविण्यात आली. त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालय नेमका काय निर्णय देणार ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

2018 मध्ये गुन्हा दाखल

अंधश्रद्धा निर्मुलन समितीने डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेकऱ्यांना पकडण्याबाबत सरकारला प्रसिद्‌धीपत्रकातून प्रश्न विचारले होते. खुनातील संशयित आरोपी म्हणून सीबीआयने 2016 मध्ये डॉक्टर विरेन्द्र तावडे, ऑगस्ट 2018 मध्ये शरद कळसकर आणि सचिन अंदुरे व मे 2019मध्ये संजीव पुनाळेकर व विक्रम भावे यांना अटक करून त्यांच्यावर आरोपपत्र दाखल केलेले आहे. अमोल काळे, अमित डिगवेकर व राजेश बंगेरा या संशयितांविरुद्ध अजूनही आरोपपत्र दाखल केलेले नाही. या खुनाचा तपास डॉ. वीरेंद्र तावडे व अमोल काळे यांच्या नावापर्यंत येऊन थांबलेला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!

बारामती वार्तापत्र च्या ताज्या बातम्या "WhatsApp", व "Telegram" वर पाहण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा.

Join What's App

Join Telegram