डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध..
इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजगृहावर हल्ला करणाऱ्या मनोवृत्तीचा निषेध..
इंदापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन केली कठोर कारवाईची मागणी.
इंदापूर:-सिद्धार्थ मखरे ( तालुका प्रतिनिधी )
दि. ७ जुलै २०२० रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबई स्थित राजगृह या निवासस्थानावर जो भ्याड हल्ला झाला. या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून संबंधित हल्ले खोरांना लवकरात लवकर अटक करून त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी इंदापूर पोलीस स्टेशनला भारतीय युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरज धाईंजे यांच्या वतीने निवेदन देण्यात आले.
यावेळी भारत मुक्ती मोर्चा चे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष नानासाहेब चव्हाण, भारत मुक्ती मोर्चा चे संपर्क प्रमुख संजय कांबळे, अँड.सुरज मखरे,सुहास मखरे सर, प्रशांत मखरे, अक्षय मखरे, रोहित ढावरे, पवन मखरे,यश मखरे ,उत्कर्ष मखरे, नागेश केंगार, अशोक घोडके इ. उपस्थित होते.