डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी इंदापूरात राज्यमंत्री भरणेंकडून अभिवादन
पुष्पांजली अर्पण करून महामानवाला वंदन
डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या ६४ व्या महापरिनिर्वाण दिनी इंदापूरात राज्यमंत्री भरणेंकडून अभिवादन
पुष्पांजली अर्पण करून महामानवाला वंदन
इंदापूर:-प्रतिनिधी
इंदापूर येथील डाॅ. बाबासाहेब आंबेडकरनगर मधील जेतवन बुद्ध विहारात ६४ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रदिप गारटकर यांचे हस्ते डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस तर माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रभागाच्या नगरसेविका तथा महिला विकास व बालकल्याण समिती सभापती राजश्री अशोक मखरे यांनी पुष्पहार अर्पण केला. पी.आर.पी.चे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय सोनवणे यांनी दिप प्रज्वलन करून गौतम बुद्धांच्या मुर्तीस पुष्प अर्पण केली.पंचशील व त्रिशरण घेऊन धम्मपुजा करण्यात आली.
याप्रसंगी माजी नगराध्यक्ष विठ्ठल आप्पा ननवरे, माजी उपनगराध्यक्ष धनंजय बाब्रस, प्रा.बाळासाहेब मखरे, प्रा.अशोक मखरे, सुधीर मखरे, विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, नगरसेवक दादासाहेब सोनवणे, मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास मोरे, शशिकांत मखरे, महादेव लोखंडे, वसिम बागवान, मुकुंद साळुंखे, खाजाभाई बागवान, विजय शिंदे, रमेश शिंदे, शिवाजी मखरे, विशाल जगताप, धनंजय तांबिले, परमेश्वर कांबळे, विकास साबळे, विशाल मखरे, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग मखरे, शुभम मखरे,गौतम मखरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.