डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीसह विविध विकास कामांचे होणार उद्या लोकार्पण
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीसह विविध विकास कामांचे होणार उद्या लोकार्पण
मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार सोहळा
इंदापूर : प्रतिनिधी
इंदापूर नगरपरिषदेच्या नूतन इमारतीसह डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन व विविध विकासकामांचा लोकार्पण व उद्घाटनाचा सोहळा शनिवारी (दि.१२) मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.
शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर येथील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन इमारतीचे लोकार्पण माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते सकाळी १० वाजता संपन्न होणार असून कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास मखरे व डॉ. सलीम मोमीन हे असणार आहेत.
तसेच इंदापूर नगरपरिषद जलशुद्धीकरण केंद्र या ठिकाणी सूजल निर्मल पाणीपुरवठा योजनेचा लोकार्पण सोहळा सकाळी साडेदहा वाजता प्रल्हाद राऊत व धनश्री धनंजय वाशिंबेकर यांच्याहस्ते संपन्न होणार आहे.
तसेच १०० फुटी रोड येथील छत्रपती संभाजी राजे शॉपिंग सेंटरचा लोकार्पण सोहळा मा. निवासी नायब तहसीलदार विष्णुपंत बाब्रस व चित्तरंजन पाटील यांच्याहस्ते सकाळी अकरा वाजता संपन्न होणार असून सदरील कार्यक्रमांच्या अध्यक्षस्थानी शहराच्या प्रथम नागरिक तथा नगराध्यक्षा अंकिता मुकुंद शहा असणार आहेत.