डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत इंदापूरसाठी तीन कोटींचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत इंदापूरसाठी तीन कोटींचा निधी मंजूर
राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती
इंदापूर : प्रतिनिधी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २०२०-२१ साठी इंदापूर तालुक्यातील २५ गावांना सुमारे ३ कोटी २ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आल्याची माहिती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली.अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजना सुरू केली आहे.
त्या अनुषंगाने इंदापूर तालुक्यातील बोराटवाडी ८ लाख, निरगुडे १० लाख, गोतंडी १३ लाख, निरवांगी ५ लाख, अंथुर्णे ३२ लाख,भरणेवाडी ५ लाख, निंबोडी ६ लाख, सणसर ५ लाख, सपकळवाडी १५ लाख, जंक्शन ५ लाख, आनंदनगर ५ लाख,अकोले ११ लाख, लोणी देवकर ८ लाख, बोरी ३५ लाख, लाकडी २६ लाख, पोंधवडी ४ लाख, न्हावी २ लाख, अगोती नंबर दोन ५ लाख, लासुर्णे २१ लाख, शिरसटवाडी १० लाख, चाकाटी ९ लाख, जाचकवस्ती ७ लाख, शेळगाव २ लाख, वालचंदनगर ३० लाख, पिंपरी बुद्रुक २१ लाख असा २५ गावांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे.
त्यानुसार अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी कार्य करणाऱ्या मान्यवर व्यक्तींचे निगडित स्थळे, सांस्कृतिक व ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व असलेल्या स्थळांचा विकास करणे त्यांची स्मारके व सांस्कृतिक विकासकामे, वाचनालय-अभ्यासिका उद्यान विकसित करणे, व्यायाम शाळा, हायमस्ट दिवे, बंदिस्त गटारी, कॉंक्रीट रस्ते, नळ पाणीपुरवठा योजना यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.
नागरी व ग्रामीण क्षेत्रातील अनुसूचित जाती,नवबौद्ध घटकांच्या वस्त्यांचा तसेच गावांचा विकास करणेकामी सदरील मंजुरी देण्यात आली असून या योजनेच्या माध्यमातून गावांचा विकास होऊन एक आदर्श गाव निर्माण होण्यास मदत होणार आहे.