डॉ.रेश्मा मोहिद्दिन पठाण याना ‘यंग रिसर्चर इन कॉमर्स अवॉर्ड’, तर डॉ.मेघा बडवे यांना ‘बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड’ प्राप्त
डॉ.रेश्मा मोहिद्दिन पठाण याना ‘यंग रिसर्चर इन कॉमर्स अवॉर्ड’, तर डॉ.मेघा बडवे यांना ‘बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड’ प्राप्त
बारामती वार्तापत्र
तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयातील डॉ.रेश्मा मोहिद्दिन पठाण यांना मलेशिया येथे यंग रिसर्चर इन कॉमर्स हा अवॉर्ड तर डॉ.मेघा बडवे यांच्या ‘फिक्स ऍसिड मॅनेजमेंट’ या विषयावरील शोधनिबंधास बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड प्राप्त झाला.
मलेशिया, कुल्लम्प्पूर येथे आयोजित केलेल्या ग्लोबल रिसर्च कॉन्फरन्स फोरम, एसटीसी सन ग्रुप ट्रेनिंग ऍण्ड कन्सल्टिंग, मलेशिया आणि ग्रामोन्नती मंडळाचे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय, नारायणगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ग्लोबल सिनर्जी २०२४ : शाश्वत आणि नाविन्यपूर्ण व्यवस्थापन, विज्ञान या विषयातील सराव, कायदा, मानवता, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या विषयावर आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.
या परिषदेमध्ये देश विदेशातील अनेक संशोधकांनी विविध विषयांवरील शोधनिवंध सादर केले. यामध्ये तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय, बारामती येथील कॉमर्स विभागातील डॉ.रेश्मा मोहिद्दीन पठाण यांनी सिस्टिमॅटिक रिव्ह्यू ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स इम्पॅक्त ऑन सप्लाय चेन मॅनेजमेंट ऑफ स्मॉल स्केल बिझनेस या विषयावर आपला शोध निबंध सादर केला.
वाणिज्य विषय संशोधनातील योगदान पाहून त्यांना यंग रिसर्चर इन कॉमर्स हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तर डॉ.बडवे यांनी फिक्स ऍसिड मॅनेजमेंट या विषयावर शोधनिबंध सादर केला व शोधनिबंधास बेस्ट पेपर प्रेझेंटेशन अवॉर्ड प्राप्त झाला.
डॉ.रेश्मा पठाण व डॉ.मेघा बडवे यांना प्राप्त झालेल्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष जवाहर शाह वाघोलीकर, सचिव मिलींद शाह वाघोलीकर, प्राचार्य डॉ.अविनाश जगताप यांनी अभिनंदन केले आहे.