डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले याकाळात अनेक जणांचे बळी देखील गेले यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात राबविण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले याकाळात अनेक जणांचे बळी देखील गेले यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
बारामती वार्तापत्र
डोर्लेवाडी वार्ताहर : पुणे जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागा अंतर्गत आज डोर्लेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शारदा ग्राम आरोग्य संजीवनी कार्यक्रमांतर्गत सर्वरोग निदान व उपचार शिबीर आयोजित करण्यात आले होते. या आरोग्य शिबिराला झारगडवाडी, डोर्लेवाडी, मेखळी, सोनगाव, पिंपळी तसेच इतर गावातील अनेक नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद दिला. या शिबिरामध्ये मधुमेह, उच्च रक्तदाब, गरोदर माता व महिलांची तपासणी, ई. सी. जी./ छातीची पट्टी तपासणी, मोफत प्रयोगशाळा तपासणी, मोफत आरोग्य विषयी मार्गदर्शन व औषध वाटप, बालरोग तपासणी, डोळे तपासणी आदी तपासणी करण्यात आल्या.
या आरोग्य शिबिरासाठी डॉ. अंजली खाडे एमडी मेडिसिन, डॉ. प्रशांत माने अस्थिरोग तज्ञ, डॉ. संकेत नाळे बाल रोग तज्ञ, डॉ. केतकी नाळे दंतरोग तज्ञ, डॉ. अजिंक्य लवटे स्त्री रोग तज्ञ, डॉ अनुज शर्मा डोळे तज्ञ, डॉक्टर बापूराव दडस वैद्यकीय अधिकारी, डॉ. वैशाली देवकाते वैद्यकीय अधिकारी यांनी आलेल्या नागरिकांची आरोग्य तपासणी केली.
यावेळी बारामती पंचायत समिती सदस्य राहुल झारगड, बा. पंचायत समिती माजी सभापती प्रतिभाताई नेवसे, डोर्लेवाडी चे सरपंच पांडुरंग सलवदे, झारगडवाडी च्या सरपंच वैशाली मासाळ, ग्रामपंचायत सदस्य अजित बुरुंगले, नितीन शेडगे, डोर्लेवाडी ग्रा. सदस्य दादासो दळवी, दत्तात्रय काळोखे, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मोहन नेवसे, संतोष मासाळ युवराज बोरकर, मधुकर बिचकुले आदी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. वैशाली देवकाते यांनी केले तर आभार सुप्रिया सावरकर यांनी मानले.
कोट – कोरोनाच्या काळामध्ये नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले याकाळात अनेक जणांचे बळी देखील गेले यामुळे नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर वेळोवेळी अशा आरोग्य शिबिराचे नियोजन करणे देखील गरजेचे आहे यामुळे रोग निदान निश्चित होईल आणि त्यावर वेळेत उपचार करता येतील असे मत एम. डी. मेडिसिन डॉ. अंजली खाडे यांनी आरोग्य शिबिर उद्घाटन प्रसंगी बोलताना सांगितले.