ड्रॅगन पाहतोय: पंतप्रधानांसह भारतातील १० हजार व्हीआयपींवर चीनचे लक्ष!
भारतातील सर्वात मोठ्या माध्यम समूहातील इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
ड्रॅगन पाहतोय: पंतप्रधानांसह भारतातील १० हजार व्हीआयपींवर चीनचे लक्ष!
भारतातील सर्वात मोठ्या माध्यम समूहातील इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त प्रकाशित केले आहे.
बारामती वार्तापत्र रिपोर्ट
लडाखच्या उत्तरेकडे चीन व भारताचे सैन्य गोळीच्या टप्प्यात समोरासमोर आले असतानाच एक अत्ंयत गंभीर व महत्वाची धक्कादायक घटना समोर आली आहे. चीनने भारतातील राजकीय, उद्योग, माध्यम, गुन्हेगारी क्षेत्रातील महत्वाच्या १० हजार जणांवर लक्ष ठेवले आहे. चीनने मोठा डाटा यासाठी हेरगिरी केला आहे. भारतातील सर्वात मोठ्या माध्यम समूहातील इंडियन एक्सप्रेसने हे वृत्त प्रकाशित केले आहे. त्यामुळे त्याची विश्वासार्हता अधिक मोठी आहे.
झेनुहा डाटा एन्फॉ्मेशन टेक्नॉलॉजी या कंपनीने ही कामगिरी केली असून राष्ट्रपती, पंतप्रधान, विरोधी पक्षनेत्या, भारतातील महत्वाच्या राज्यांतील मुख्यमंत्री, विरोधी राज्यांतील उध्दव ठाकरे, ममता बॅनर्जी, अशोक गेहलोत, अमरिंदर सिंग, नवीन पटनाईक, शिवराजसिंह चौहान आदी मुख्यमंत्री तसेच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या सह १० हजार जणांच्या हालचाली टिपल्या जात आहेत. यासंदर्भात संबंधित वृत्तमाध्यमात सविस्तर वृत्त प्रकाशित करण्यात आले आहे.
चीनच्या कंपनीकडून केली गेलेली मोठी हेरगिरी असल्याचे यातून स्पष्ट होत असून भारतात सैन्यदलाचा वापर न करता राजकीय उलथापालथी करण्यावर तसेच महत्वाचे राजकीय, राजनैतिक व परराष्ट्रीय निर्णयांवर याद्वारे नजर ठेवली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.