
ढेकळवाडी ते भवानीनगर रस्त्यासाठी ग्रामस्थ आक्रमक.
२० सप्टेंबरला आंदोलनाचा इशारा…
बारामती वार्तापत्र
भवानीनगर ढेकळवाडी येथील गावठाण ते जाचक वस्ती हा रस्ता रहदारीचा असून तो रस्ता गेली शंभर वर्षापासून वहीवाटीचा हा रस्ता साखर कारखाना व इंदापूर कडे जाण्यासाठी एकमेव रस्ता आहे. यासाठी पर्यायी रस्ता नाही. काही लोकांच्या मनमानीमुळे व अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे ढेकळवाडी गावाला वेठीस धरला आहे. रस्त्याचे काम सुरू न झाल्यास ग्रामस्थांच्यावतीने आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. यासंदर्भात निवेदन प्रांतअधिकारी यांना देण्यात आले
अधिकारीही नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत. एका कुटुंबासाठी ढेकळवाडी गावाला वेठीस धरले जात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हापरिषदेच्या माध्यमातून १ कोटी रुपये या रस्त्यासाठी दिलेले आहेत. परंतु अजूनही काम सुरू नाही. त्यामुळे ढेकळवाडी ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत.
या रस्त्याचे काम सुरू न झाल्यास (दि:२०) रोजी याच खराब चिखल झालेल्या रस्त्यावर प्रतीकात्मक आंदोलन म्हणून गाड्या पळवण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. यासाठी प्रथम येणाऱ्या स्पर्धकाला तीन हजार रुपये बक्षीस ठेवण्यात आले आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दौंड तालुका निरीक्षक बापुराव सोलनकर यांनी प्रांतअधिकारी दादासाहेब कांबळे यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. यावेळी संपतराव टकले, उपसरपंच शुभम ठोंबरे, माजी सरपंच शिवाजी लकडे, रामदास पिंगळे, बाळासाहेब बोरकर, नामदेव ठोंबरे, सुभाष ठोंबरे, संजय टकले उपस्थित होते.