तांदुळवाडीतील चोरिचे गुन्हेगार जेरबंद…पुणे ग्रामिण LCB पथकाची जबरदस्त कामगिरी.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.

तांदुळवाडीतील चोरिचे गुन्हेगार जेरबंद…पुणे ग्रामिण LCB पथकाची जबरदस्त कामगिरी.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
बारामती वार्तापत्र
तांदूळवाडी ता.बारामती येथील चोरीचा गुन्हा उघडकीस : पुणे ग्रा. LCB पथकाची कामगिरी
दि.३१/१/२०२१ रोजी १२.०० ते दि.१/२/२०२१ रोजी ०५.०० वा. चे दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरटयाने फिर्यादी संतोष मानसिंग चव्हाण वय ३२ रा.कल्याणीनगर, तांदूळवाडी ता.बारामती यांचे उघडे घराचे दरवाजावाटे प्रवेश करुन ५०,०००/- रुपये रोख रक्कम, एक होंडा शाईन मोटरसायकल, दोन मोबाईल व एक तोळा सोन्याची चैन असा एकूण ९९,०००/- रुपयाचा माल चोरुन नेलेला होता . त्याबाबत फिर्यादी यांनी दिलेल्या तक्रारीवरुन बारामती तालुका पो.स्टे . गु.र.नं. ६९/२०२१ भादंवि क.३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता.
सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना आज रोजी LCB टिमला मिळालेल्या माहितीनुसार आरोपी नामे सुनिल मनोहर राठोड वय २५ रा.मदभावी एलटी नं.१ ता.जि.विजापूर कर्नाटक यास तरळे (कणकवली) जि.सिंधुदुर्ग येथून गुन्हयातील चोरलेली शाईन मोटरसायकल व दोन मोबाईलसह असा किं.रु.१९,०००/- चे मालासह ताब्यात घेण्यात आलेले आहे.
सदर आरोपीची वैदयकिय तपासणी करुन त्यास बारामती तालुका पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले आहे.
सदरची कामगिरी ही मा.पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख सो., बारामती विभाग अपर पोलिस अधीक्षक श्री.मिलींद मोहिते सो. यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.पद्माकर घनवट,पोहवा. महेश गायकवाड,पोहवा. निलेश कदम,
पोहवा. सचिन गायकवाड,पोहवा. ज्ञानदेव क्षिरसागर,पोहवा. काशिनाथ राजापुरे यांनी केलेली आहे.