तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती इंदापूर च्या अध्यक्षपदी अतुल झगडे यांची निवड
तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समिती कार्य

तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती इंदापूर च्या अध्यक्षपदी अतुल झगडे यांची निवड
तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समिती कार्य
बारामती वार्तापत्र
महावितरण कंपनीचा कारभार पारदर्शक व प्रभावीपणे चालविण्यासाठी तसेच ग्राहकांना उत्तम व दर्जेदार सेवा मिळावी यासाठी राज्य सरकारने जिल्हानिहाय तसेच तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समिती च्या इंदापूर तालुका अध्यक्षपदी झगडेवाडी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते व इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अतुल झगडे यांची निवड करण्यात आली आहे. तसा लेखी आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त झाला आहे.
लोकसंख्येने मोठा तालुका असेल त्या तालुक्याच्या ठिकाणी आमदार हे जिल्हा तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीचे अध्यक्ष असतात परंतु इंदापूर तालुक्यात राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही महत्त्वाची जबाबदारी कार्याध्यक्ष अतुल झगडे यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे अतुल झगडे यांचे तालुका स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
झगडेवाडी येथील असणारे अतुल झगडे हे शिक्षण घेत असताना वडिलांचे छत्र हरपले त्यांनी शिक्षण पूर्ण करत असतानाच कुटुंबाची जबाबदारी सांभाळत महालक्ष्मी उद्योग समूहाची स्थापना केली.छोट्या व्यवसायापासून सुरू केलेले काम मोठ्या स्वरूपात करून आज त्यांचे महालक्ष्मी उद्योग समूह या नावाने अनेक ठिकाणी व्यवसाय सुरू आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून अतुल झगडे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते म्हणून काम पाहत आहेत झगडेवाडी चे माझी सरपंच चुलते प्रशांत झगडे व माझी सरपंच चुलती मनीषा झगडे यांच्या माध्यमातून गावातील राजकारणात खूप वर्षा पासून सक्रिय सहभाग पक्षाशी एकनिष्ठ असणाऱ्या झगडे यांनी महात्मा फुले तरुण मित्र मंडळाच्या माध्यमातून गाव पातळीवर विविध उपक्रम राबवत आपल्या कामाची चुणूक दाखवून दिली.
गाव पातळी राबवलेले विविध उपक्रम’आईच्या वाढदिवसानिमित्त धान्य किट चे केलेले वाटप व गावातील सर्वसामान्यांना सोबत घेऊन काम करण्याची वृत्ती राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी हेरून त्यांना २०१९ साली इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. या वेळी तालुक्यातील ३५० लोकांना कृषी विभागाकडून शेततळ्यातील अस्तरीकरनचे अनुदान मिळण्याची मुदत संपलेली असताना सुद्धा राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून पाठपुरावा करून प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला रक्कम ७५ हजार रुपये प्रत्येकी प्रमाणे लाभ मिळवून दिला.या निमित्ताने महाराष्ट्रातील वचीत लाभधारक शेतकऱ्यांना एकूण ५६ कोटी रुपयांचा लाभ मिळवून दिला. असे हे अशक्य काम सातत्याने पाठपुरावा करून मामाच्या माध्यमातून ते शक्य केले.
२०१८ मध्ये झालेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये झगडेवाडी ग्रामपंचायत ओबीसी महिला राखीव झाली यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी अतुल झगडे यांचे काम पाहून त्यांच्या पत्नी सौ. रूपाली झगडे यांना जनतेतून प्रथमच बिनविरोध सरपंच पदाची संधी दिली.
त्यानंतर झगडेवाडी गावात विकासासाठी तीन कोटी रुपयांची कामे त्यांनी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून करून घेतली.या वेळी गावात एम एस सी बी कडून तीन कोटी रुपयांचे सब स्टेशन मंजूर करून घेतले.
त्याचे काम पाहून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांना इंदापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्याध्यक्ष पदाची जबाबदारी दिली.
अतुल झगडे हे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांची निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. तसेच अत्यंत विश्वासू असल्याने त्यांच्यावर तालुकास्तरीय विद्युत वितरण नियंत्रण समितीची जबाबदारी सोपवण्यात आली असल्याचे दिसून येत असून यापूर्वी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अतुल झगडे यांच्या कामाचे कौतुक केले आहे. अतुल झगडे हा सर्वांना सोबत घेऊन जाणारा उत्तम संघटन कौशल्य असणारा ,शांत, संयमी नेतृत्व करणारा,गोरगरीब लोकांना सहकार्य करणारा हा माझा एकनिष्ठ कार्यकर्ता असल्याचे राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी यापूर्वी सांगितले आहे. त्याची पोचपावती आज त्यांना या रुपाने मिळाल्याची इंदापूर तालुक्यात चर्चा आहे.
यावेळी बोलताना नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल झगडे म्हणाले की राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यावर खूप मोठी जबाबदारी सोपवली आहे.निश्चितच ही जबाबदारी आदरणीय मामाच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण शमतेने आणि तेवढ्याच विश्वासाने पार पाडण्याचा प्रयत्न मी करीन व ही जबाबदारी पार पाडून त्यांच्या विश्वासास पात्र राहून इंदापूर तालुक्यातील शेतकरी व्यापारी उद्योग धंदे यांच्या अडचणी सोडविण्यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे..
तालुकानिहाय विद्युत वितरण नियंत्रण समिती कार्य
समित्याच्या माध्यमातून महावितरणतर्फे सुरू असलेल्या विविध योजनांचा आढावा घेणे, वीज बिलाची वसुली, विजेचा गैरवापर व ते रोखण्यासाठी केले जाणारे प्रयत्न, पैसे भरूनही वीज जोडणी न मिळालेल्या कृषीपंप व घरगुती ग्राहकांच्या जोडण्याचा आढावा घेणे, ग्राहकांना खात्रीशीर विद्युत पुरवठा व चांगली सेवा मिळावी यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. समितीच्या कार्यकक्षेतील सर्व विभाग भारनियमनमुक्त करणे, अशा विविध वीज विषयक बाबींबाबत या समितीतर्फे त्रैमासिक आढावा घेण्यात येईल. या समितीने सुचवलेल्या सूचना अथवा मार्गदर्शन शासनस्तरावर पाठवण्यात येऊन त्याचा पाठपुरावा करण्यात येणार आहे.