राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गोतंडी शेळगाव निमगाव केतकी गंगावळण येथील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
शेतीपीकांचे प्रचंड नुकसान झाले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन संसार उध्वस्त झाले

राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी गोतंडी शेळगाव निमगाव केतकी गंगावळण येथील नुकसानग्रस्त भागाची केली पाहणी
शेतीपीकांचे प्रचंड नुकसान झाले तर अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन संसार उध्वस्त झाले
इंदापूर; बारामती वार्तापत्र
इंदापूर तालुक्यामध्ये काल झालेल्या मुसळधार व वादळी पावसामुळे गोतोंडी,शेळगाव,निमगाव केतकी,गंगावळण तसेच इतर भागातील घरांचे आणि शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.या निमित्ताने आज सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा.ना.श्री.दत्तात्रय (मामा) भरणे साहेबांनी तालुक्यातील नुकसान झालेल्या काही भागाची प्रत्यक्ष बांधावर जाऊन पाहणी केली.
भरणे म्हणाले, झालेली घटना ही वेदनादायी असून झालेले नुकसान तात्काळ न भरुन निघणारे आहे.मात्र राज्यसरकार याची गंभीर दखल घेऊन नुकसान ग्रस्तांना मदतीचा हात देईल असे आश्वासन मंत्री भरणे यांनी दिले.
यावेळी इंदापूरचे तहसीलदार अनिल ठोंबरे,तालुका कृषी अधिकारी भाऊसाहेब रुपनवर, महावितरण, पोलीस, महसूलचे अधिकारी उपस्थित होते.
दिलीप उमाकांत शेटे यांची काढणीस आलेली एक एकर केळी बाग वादळी वा-यात जमीन जमीनदोस्त झाली. तर विजय विष्णू शेटे यांची डाळींबाची झाडे बुडासकट उन्मळूम पडली.अतिशय कष्ट करुन लेकराप्रमाणे सांभाळलेले पिक डोळ्यासमोर उध्वस्त झाले. असे सांगताना महिलांच्या आश्रूंचा बांध फुटला.