आपला जिल्हा

तालुक्यात जनावरांना विक्रमी लसीकरणं.

एकाचवेळी 53 हजार जनावरांना लसीकरण.

बारामती:वार्तापत्र बारामती तालुक्यात एकाच वेळी 53 हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले.

पाऊस काळ सुरू झाला की वातावरणातील बदल अपरिहार्य असतो. आणि या वातावरण बदलामुळे वेगवेगळ्या रोगजंतूंची वाढ होते. या रोगजंतूंचा मानवा बरोबरच जनावरांच्या आरोग्यावरही दुष्परिणाम होत असतात. म्हणूनच पावसाळा सुरू होण्यापूर्वी जनावरांना लसीकरण करणे महत्वाचे असते.

पावसाळ्यात जनावरांना वेगवेगळ्या साथीचे रोग जडतात.  गडूळ व दूषित पाणी जनावरांच्या पिण्यात आल्यास तसेच पावसाळ्यात उगवलेला हिरवा चारा अधिक प्रमाणात खाण्यात आल्यास त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतात. व यातूनच जनावरांना साथीच्या रोगाची लागण होते.

त्यामुळे पशुपालकांनी आपल्या जनावरांना विविध रोग प्रतिबंधात्मक लसीकरण करून घेण्याचे आव्हान बारामती तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांनी केले आहे.

मान्सुन पुर्व काळात प्रतिवर्षी बारामती तालुका पशु वैद्यकीय संस्थांमार्फत जनावरांना लसीकरण केले जाते. सध्या सर्वत्र कोणाचा प्रादुर्भाव असल्याने भीतीपोटी अनेक पशु मालक जनावरांना लसीकरण करण्यासाठी पशुवैद्यकीय दवाखान्यात जाण्यासाठी टाळाटाळ करीत आहे.

त्यामुळे बारामती तालुका पशुवैद्यकीय संस्थांनी घरोघर जात जनावरांना रोग प्रतिबंधात्मक लसीकरण देण्यास सुरुवात केली आहे. बारामती तालुक्यातील कार्यक्षेत्रात असणाऱ्या २३ गावातील आतापर्यंत  ५२ हजार ९०० लहान मोठ्या  गाई,म्हैस, शेळ्या, मेंढ्यांना लसीकरण करण्यात आले आहे.

पावसाळ्यात जनावरांचे गोठे अस्वच्छ राहणे, पावसापासून संरक्षण होणे, दूषित व गढूळ पाणी पिण्यात आल्याने तसेच पावसाळ्यात बदलणार्‍या वातावरणामुळे जनावरांची रोगप्रतिकारक शक्ती खालावते. अशावेळी रोगजंतूला वाव मिळून जनावरांच्यात साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होतो. आशा संसर्गजन्य रोगांपासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी  लसीकरण करणे आवश्यक असते.

जनावरांनाा एखादा आजार जडल्यास पशु मालकाला मोठा खर्च करावा लागतो. रोग जर गंभीर असेल तर जनावर दगावून पशु मालकाला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता असते त्यामुळे नियमित लसीकरण करणे गरजेचे असते.

पावसाळ्यात जनावरांना लाळ खुरकत, फऱ्या, आंत्रविषार, आधी साथीचे आजार टाळण्यासाठी दरवर्षी  पशुधन विभागामार्फत जनावरांना नियमित लसीकरण केले जाते. मात्र कोरोनाच्या धास्तीने अनेक जण दवाखान्यात येऊन जनावरांना लसीकरण करण्याचे टाळत आहे. त्यामुळे पशुधन विभागामार्फत घरोघर जाऊन लसीकरण केले जात आहे. आतापर्यंत 53 हजार जनावरांना लसीकरण करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!