तुम्हाला माहिती आहे का…? राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न…?
मोटर सायकलवरून चार जण

तुम्हाला माहिती आहे का…? राष्ट्रवादीच्या युवा नेत्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न…?
मोटर सायकलवरून चार जण
क्राईम ; बारामती वार्तापत्र
बारामतीत सूर्यनगरीमध्ये संध्याकाळी साडेसात ते आठच्या सुमारास अज्ञात इसमांनी राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव मोहसिन पठाण यांच्यावर गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
याप्रकरणी मोहसिन पठाण यांनी तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, मोहसिन पठाण यांचा लेबर कॉन्ट्रॅक्टचा व्यवसाय आहे. आज संध्याकाळी सूर्यनगरी येथील साहिल रेसिडेन्सी नजिक चार अज्ञात इसमांनी येऊन हा प्रकार केला. सूर्यनगरीतील अहिल्यादेवी होस्टेल समोरुन मोहसिन पठाण हे रस्त्याने पायी जात असताना यामाहा मोटर सायकलवरून चार जण आले व फिर्यादी जवळ थांबून ‘बंदूक काढ आणि गोळ्या घाल’ असे एकमेकांना म्हणत मोहसीन यांना दमदाटी करून निघून गेल्याचे पठाण यांनी सांगितले.
त्यानंतर पाठीमागून काळ्या रंगाच्या डिस्कव्हर दुचाकीवरून दोन अनोळखी इसम आले. ते देखील दमदाटी करून निघून गेले अशी फिर्याद मोहसीन अकबर पठाण यांनी दिली आहे. या प्रकरणी तालुका पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे.