‘तुम्हाला विनंती करतो बाबांनो की मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका’, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला

‘तुम्हाला विनंती करतो बाबांनो की मेहरबानी करून कोर्टाची पायरी चढू नका’, असा मोलाचा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला
बारामती वार्तापत्र
सद्यस्थितीत जमीन ही घराघरातील वादाचे मूळ आहे. हे वाद कायमस्वरुपी मिटावेत अशी आमची भूमिका आहे. त्यामुळेच विविध उपक्रम हाती घेतले जात आहेत. मात्र बाबांनो कोर्टाची पायरी चढू नका” असा सल्ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. बारामतीत डिजीटल स्वाक्षरीत सातबारा वाटप उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी त्यांनी शेतकऱ्यांच्या घराघरातील वादाचं मूळ हे जमीन असल्याचं सांगितलं. त्यामुळे वाद करत बसू नका, तुम्हाला कोर्टात जाईपर्यंत सगळे गोड बोलतील. नंतर त्रास होईल. त्यामुळं कोर्टाची पायरी चढू नका. असा सल्ला अजित पवार यांनी दिलाय.
“तलाठी काळा बाजार करायचे”
‘पूर्वी आमच्या लहानपणी तलाठी अर्थात भाऊ साहेबांचाचा थाट असायचा. त्यावेळी काही भाऊसाहेबांनी कुणाच्याही जमिनी कुणाच्याही नावावर करण्याचे उद्योग केले. त्याकाळी भाऊ साहेबांचा मोठा दरारा असायचा. पुढे काळ बदलत गेला. नवनवी आव्हाने समोर आली. आता सर्वत्र संगणकीकरण मोठ्या प्रमाणात झाले. तसेच कामात सुलभता आणण्याचा, वेळेची बचत करण्याचा व हेलपाटे मारु लागू नये यासाठी प्रयत्न सुरू आहेत’ असेही अजित पवारांनी म्हटले.