तुम्ही कुणाची सुपारी घेतलीये का?’मी पण मराठ्याच्याच पोटचा, उपमुख्यमंत्री अजित पवार
हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही.
तुम्ही कुणाची सुपारी घेतलीये का?’मी पण मराठ्याच्याच पोटचा, उपमुख्यमंत्री अजित पवार
हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही.
पुणे:प्रतिनिधी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या समारंभादरम्यान घडलेल्या एका प्रसंगाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उपस्थितांना संबोधित केले.
अजित पवारांच्या भाषणा दरम्यान मराठा आरक्षणाच्या संदर्भात मागणी करण्यात आली. पहिल्यांदा तो तरुण बोलला. त्यानंतर अजित पवारांच्या भाषणावेळी पुन्हा एकदा त्याने बोलण्यास सुरुवात केली तेव्हा अजित पवार संतापले आणि म्हणाले, अजित पवार म्हणाले मी पण मराठ्याच्याच पोटचा आहे. तू कोणाची सुपारी घेऊन आला आहेस का? मी ऐकून घेतलं आता माझं ऐका. आज शिवजयंती आहे. ही बोलण्याची पद्धत नाहीये. आम्हाला हे कळत नाहीये का? आम्ही पण मराठा समाजाचे आहोत. राज्याचं नेत्रृत्व करताना इतर गोष्टींचाही विचार करावा लागतो.
आज शिवजयंती आहे. हा मुद्दा आत्ता उपस्थित करण्याचे कारण नाही. या व्यासपीठावर मी, बाळासाहेब थोरात, दिलीप वळसे-पाटील बसलो आहोत. आम्ही पण मराठ्याच्या पोटीच जन्माला आलो आहोत ना. मग आम्हाला आमच्या जातीचा आणि समाजाचा अभिमान नाही का? शिवबांनी आपल्याला काय शिकवलंय? छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरापगड जातींना एकत्र घेऊन स्वराज्य स्थापन केले होते.
ही गोष्ट सगळ्यांनाच मान्य करावी लागेल. तरुण मुलांचं रक्त सळसळतं असतं.उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की, आम्ही सर्वांनी विधिमंडळात एकमताने मराठा समाजाला आरक्षण मिळायला हवं अशी भूमिका घेतली. त्याच्याआधीच्या काळातही आरक्षण दिलं पाहिजे अशी भूमिका घेतली पण काही निमित्ताने न्यायालयात त्याला अडचण आली. त्यानंतर आयोग स्थापन करुन आरक्षण देण्याचा प्रयत्न केला. मुंबई हायकोर्टात त्याला मान्यता मिळाली पण सुप्रीम कोर्टाने फेटाळलं.
यावेळी त्यांनी संभाजीराजे छत्रपती यांनीही मराठा आरक्षणासाठी घेतलेल्या उपोषणाच्या भूमिकेवर फेरविचार करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी किल्ले शिवनेरीवर शिवजन्माचा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला अजित पवार, बाळासाहेब थोरात आणि आदित्य ठाकरे हे उपस्थित होते.